Join us

3856_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 03:58 IST

कारची आवड सर्वांनाच असते. ज्यावेळी एखादी सुंदर कार रस्त्यावरुन धावत असते, त्यावेळी सर्वच जण त्या कारकडे पाहत असतात. जगभरातील अब्जाधीशांकडे कोणत्या कार असतील बरे, त्याची माहिती देत आहोत.

कारची आवड सर्वांनाच असते. ज्यावेळी एखादी सुंदर कार रस्त्यावरुन धावत असते, त्यावेळी सर्वच जण त्या कारकडे पाहत असतात. जगभरातील अब्जाधीशांकडे कोणत्या कार असतील बरे, त्याची माहिती देत आहोत.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक. बिल गेटस् यांना पोर्श्चेविषयी अधिक प्रेम आहे. जर्मनीच्या अ‍ॅटो क्षेत्रातील सर्वात उत्कृष्ट अशा गाड्यांचा त्यांच्याकडे ताफा आहे. पोर्श्चे ९५९ कुप ही त्यांची सर्वात आवडती आहे. त्याला सगळे ‘गेटस् ९५९’ असेही म्हणतात. १३ वर्षापूर्वी ही कार तयार करण्यात आली होती. ही कार खूपच दुर्मिळ आहे. जगातील २३० जणांकडेच ही आहे.भारतामधील श्रीमंत व्यक्तींमधील एक नाव. जग्वार लँड रोव्हरला टाटांनी विकत घेतले हे कोण विसरेल. त्यांच्याकडे अनेक ब्रिटीश गाड्या आहेत. लाल फेरारी कॅलिफोर्निया विकत घेतल्याचे २०१० साली कळाले होते. त्यांच्याकडे चेर्सलर सेबरिंग्ज, मर्सिडीज एसएल ५००, मेसराती क्वॉटरपोर्टे आणि कॅडीलॅक एक्सएलआर या कार आहेत.फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे अनेक कार आहेत. त्यात अ‍ॅक्युरा टीएसएक्स आणि वोक्सवॅगन गोल्फ जीटीआय यांचा समावेश आहे. ३३ कोटी डॉलर्स इतकी संपत्ती असलेल्या झुकेरबर्गकडे १.३ कोटी डॉलर्सची पगानी ह्युआरा ही गाडी आहे.भारतामधील श्रीमंत व्यक्ती. मुकेश अंबानी यांच्याकडे अलिशान गाड्यांचा ताफा आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष असणाºया अंबानी यांच्याकडे अलिशान मर्सिडीज बेंझ एस क्लास ही गाडी आहे. त्याशिवाय मेबॅच ६२ आहे. आतापर्यंत सर्वात सुंदर कार म्हणून मेबॅचची ओळख आहे. याची सर्वसाधारण किंमत ५ कोटी इतकी आहे. याशिवाय अंबानी यांच्याकडे प्रायव्हेट जेटस् आणि यॉटस आहेत.‘किंग आॅफ गुड टाईम्स’ असे नाव असणाºया विजय मल्ल्या यांचे दिवस सध्या जरी चांगले नसले तरी त्यांच्या राहणीमानात फारसा फरक पडलेला नाही. त्यांच्याकडे अनेक व्हिंटेज क्लासिक कार आहेत. १९२६ ची मर्सिडीज के टाईप, १९६५ ची शेल्बी अमेरिका कोब्रा ४२७, जग्वार एक्सजे २२० हे १९९४ चे मॉडेल आणि १९२५ ची सनबीम ही कार आहे.भारतीय सिनेमाचा सुपरस्टार असणाºया अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक कार आहेत. त्यांच्याकडे साधारणत: २५ कार असतील. यामध्ये रोल्स रॉईस फँटम, पोर्श्चे केमॅन आणि लेक्सस एलएक्स४७० यांचा समावेश आहे.आॅस्कर विजेत्या डीकॅप्रिओच्या गॅरेजमध्ये अनेक कार आहेत. त्यांचे पर्यावरणविषयक प्रेम सर्वांनाच माहिती आहे. पर्यावरणपूरक असणारी फिस्कर कर्मा आणि लेक्सस हायब्रीड ही कार त्यांच्याकडे आहे. अशीही अफवा आहे की, डीकॅप्रिओला फिस्कर इतकी आवडली की त्याने त्यामध्ये आपली गुंतवणूक केली आहे.