इंग्लिश पॉप गाण्यांच्या व्हिडियोमध्ये बाथटबला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यांपैकी बेस्ट 5 व्हिडियोज पाहून तुम्हीच ठरवा...बाथटबमध्ये असे काय विशेष आहे?पॉप डिवा बेयॉन्सेचे ‘मी. मायसेल्फ अँड आय’ हे गाणे जोडीदाराने विश्वासघात केल्यानंतर मुलीच्या दु:खाच्याबाबतीत आहे.सिल्करोब घातलेली सेलेना गाण्याच्या व्हिडियोमध्ये तिच्या आवडत्या अॅक्टरच्या घरी लपून वावरताना दिसते. त्याचे बेडरुम, कपडे ट्राय केल्यानंतर ती बाथटबचा वापर करते.२००९ साली आलेल्या या गाण्यात ब्रिटनी चंदेरी दुनियातील दु:ख सांगते. कॅमेºयांच्या फ्लॅशमधून, चाहत्यांच्या गराड्यातून सुटून बॉयफ्रेंडसोबत भांडणानंतर ती बाथटबमध्ये शेवटचा श्वास घेते.बाथटबमध्ये चित्रित झालेले हे गाणे रिहानाच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. बे्रक-अपच्या वेदना सांगणाºया या गाण्यात बाथटबची महत्त्वाची भूमिका आहे.म्युझिक व्हिडियो क्वीन लेडी गागाचे या सुमारे १४ मिनिटांच्या गाण्यात तिचा संपूर्ण प्रवास दाखविण्यात आला आहे. स्टारडममधून येणाºया नैराश्यातून सुटका मिळवण्यासाठी ती बाथटबची मदत घेते.