Join us

3853_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 01:51 IST

फिल्मफेअर पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारांचे दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे वितरण केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. बॉलीवूडच्या गौरव करण्यात आलेल्या पाच सुप्रसिद्ध अभिनेत्रींची ही माहिती...

फिल्मफेअर पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारांचे दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे वितरण केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. बॉलीवूडच्या गौरव करण्यात आलेल्या पाच सुप्रसिद्ध अभिनेत्रींची ही माहिती...२००० पासून चित्रपटसृष्टीत पर्दापण केलेल्या करीना कपूर-खान हीने विविध चित्रपटात उत्कृष्ट भूमीका केलेल्या आहेत. तिला २००४ मध्ये चमेली या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केल्याने फिल्मफे अर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.भारतीय सिनेमासृष्टीतील एक प्रमुख अभिनेत्री व विश्वसुंदरीचा किताब जिंकणारी ऐश्वर्या रॉय बच्चन होय. हीस हम दिले दे चुके सनम (२०००) व देवदास (२००३) या दोन चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.आएगी बारात या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाºया राणी मुखर्जी हिस सलग दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. २००६ मध्ये आलेला ब्लैक व २००५ मध्ये आलेला हम तुम या दोन चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला होता.२०१४ मध्ये प्रदर्शीत झालेला क्वीन या चित्रपटातील अभिनयामुळे कंगणा राणावत हिस फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. यातील तिच्या अभिनयामुळे तिला बॉलीवूडचे क्वीन सुद्धा म्हटले जाते.भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही हिंदी चित्रपटातील एक प्रमुख अभिनेत्री आहे. रंगुला रत्नम या तेलगू चित्रपटापासून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. १९८० मध्ये प्रदर्शीत झालेल्या जुदाई या चित्रपटातील अभिनयामुळे तिला फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.