3844_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 08:48 IST
एकच घड्याळ प्रत्येक प्रसंगी घालणे तितकेसे संयुक्तिक वाटत नाही आणि प्रसंगानुरुप नवी घड्याळ विकत घेणे जरा खिशालाही जड जाईल. यावर उपाय म्हणजे, घड्याळीचा बेल्ट बदलणे. ते कसे?
3844_article
एकच घड्याळ प्रत्येक प्रसंगी घालणे तितकेसे संयुक्तिक वाटत नाही आणि प्रसंगानुरुप नवी घड्याळ विकत घेणे जरा खिशालाही जड जाईल. यावर उपाय म्हणजे, घड्याळीचा बेल्ट बदलणे. ते कसे?जिममध्ये किंवा खेळताना फॅब्रिक बेल्टचा वापरावा. घाम येऊ शकतो अशा कोणत्याही प्रसंगी फॅब्रिक बेल्ट इज बेस्ट आॅप्शन. वेलक्रो मटेरिअल पासून बनलेल्या फॅब्रिक बेल्ट शक्यतो वापरावा. आरामदायी आणि सहज अॅडजस्ट होणारा असा हा बेल्ट असतो. हा थोडासा बुचकळ्यात टाकणारा पर्याय आहे. फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही प्रसंगी तुम्ही लेदर नाटो बेल्ट वापरू शकता. चॉकेलेट ब्राऊन रंगाचा लेदर बेल्ट घडीला जास्त भडक लूक न देता आकर्षक बनवतो. घडीच्या डायल कसा आहे त्यावरून याची निवड करा. घडीला भडक रंगाचा रबर बेल्ट लावून तुम्ही बोल्ड अँड डॅशिंग लूक प्राप्त करू शकता. तुमच्या घडीला अशा प्रकारचा रबर बेल्ट लावल्यामुळे फॉर्मल लूक जाऊन अँडव्हेंचरस प्लेफूल लूक येतो. बाहेर फिरायला जाताना किंवा मित्रांसोबत पार्टीमध्ये रबर बेल्ट लावावा. तसे पाहिले गेले तर मेटल बेस्लेट कोणत्याही प्रसंगासाठी बेस्ट आॅप्शन आहे. औपचारिक आॅफिस मीटिंगच्या वेळी तुमच्या घडीला मेटल बेस्लेट लावा. बाहीच्या आतून अशंत: दिसणारा किंवा पूर्ण बाहेर आलेले मेटल बे्रस्लेट इम्प्रेसिव्ह दिसतो.