3832_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 07:18 IST
एक जमाना होता, ज्यावेळी सुंदर अभिनेत्रींना चित्रपटात केवळ ‘शो पीस’ म्हणून भूमिका दिली जात असे. केवळ अभिनेत्यांना कॉम्प्लीमेंट देणे ऐवढेच काम या अभिनेत्रींकडून केले जात असे. मात्र, काळ बदलला आहे. आता बॉलीवुड सुंदºया डॅशिंग भूमिकांमध्ये दिसू लागल्या आहेत. अलीकडच्या काळातील ‘नीरजा’, ‘क्वीन’ या चित्रपटात सोनम कपुर आणि कंगना रणावत यांनी केलेली भूमिका त्याचे उत्तम उदाहरण देता येईल. मात्र हा बदल अचानक झाला नाही. यासाठी तब्बल १०० वर्षाचा काळ लागला आहे. आता तर पोलिसांच्या डॅशिंग भूमिकादेखील अभिनेत्री सहस साकारू लागली आहे. बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची प्रमुख भूमिका असलेला ‘जय गंगाजल’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशाच डॅशिंग पोलीस अधिकाºयांच्या भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींवर एक नजर...
3832_article
एक जमाना होता, ज्यावेळी सुंदर अभिनेत्रींना चित्रपटात केवळ ‘शो पीस’ म्हणून भूमिका दिली जात असे. केवळ अभिनेत्यांना कॉम्प्लीमेंट देणे ऐवढेच काम या अभिनेत्रींकडून केले जात असे. मात्र, काळ बदलला आहे. आता बॉलीवुड सुंदºया डॅशिंग भूमिकांमध्ये दिसू लागल्या आहेत. अलीकडच्या काळातील ‘नीरजा’, ‘क्वीन’ या चित्रपटात सोनम कपुर आणि कंगना रणावत यांनी केलेली भूमिका त्याचे उत्तम उदाहरण देता येईल. मात्र हा बदल अचानक झाला नाही. यासाठी तब्बल १०० वर्षाचा काळ लागला आहे. आता तर पोलिसांच्या डॅशिंग भूमिकादेखील अभिनेत्री सहस साकारू लागली आहे. बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची प्रमुख भूमिका असलेला ‘जय गंगाजल’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशाच डॅशिंग पोलीस अधिकाºयांच्या भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींवर एक नजर...देसी गर्ल प्रियंका चोपडाने आतापर्यंत तीन वेळा पोलीसाची भूमिका साकारली आहे. ‘डॉन, गुंडे आणि प्रकाश झा चा बहुचर्चित ‘जय गंगाजल’ या चित्रपटात तिने आपल्या डॅशिंग भूमिकेची चुणुक दाखविली आहे. प्रियकांप्रमाणे आतापर्यंत एकाही अभिनेत्रीला असा करिष्मा करता आला नाही. ‘मर्दानी’ या चित्रपटातील रानी मुखर्जीची भूमिका चांगलीच गाजली होती. बॉक्स आॅफीसवर जरी चित्रपट चालला नसला तरी तिच्या भूमिकेचा सर्वत्र कौतुक केले गेले. सौदर्यंवतीचा पुरस्कार पटकावलेल्या सुष्मिता सेनने ‘समय’ या चित्रपटात साकरलेल्या डॅशिंग पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले गेले. बिल्लो रानी म्हणून ओळखली जाणारी हॉट बिपाशा बासुने ‘गुनाह, धुम-२ आणि चोर मचाए शोर’ या चित्रपटात पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारली. बिप्सने या भूमिकांमुळे सगळ्यांचीच वाह! वाह! मिळविली. धक धक गर्ल माधुरी दीक्षितची ‘खलनायक’ चित्रपटातील पोलीस अधिकाºयाची भूमिका गाजली होती. बॉलीवुडची खल्लास गर्ल ईशा कोपिकर ‘क्या कूल हैं हम’ या कॉमडी चित्रपटात डॅशिंग पोलीस आॅफीसरच्या भूमिकेत बघावयास मिळाली. चित्रपटातील तिचे बोल्ड डायलॉग प्रेक्षकांना खुपच भावले. डिंपल गर्ल प्रिटी जिंटाची ‘संघर्ष’ या अॅक्शन चित्रपटातील भूमिका कौतुकास्पद ठरली. रेखाने १९९१ मध्ये ‘फूल बने अंगारे’ या चित्रपटात साकारलेली पोलीस अधिकाºयाची भूमिका त्याकाळी महिलांसाठी प्रेरणादायी ठरली. तब्बूच्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली. या अगोदर तिने कोहराममध्ये पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारली आहे.