Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘हेट स्टोरी-४’ चित्रपटासाठी मिळालेले २५ लाख ‘या’ अभिनेत्रीने मसाज अन् शूजसाठी केले खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 18:07 IST

‘हेट स्टोरी-४’ या चित्रपटात जबरदस्त बोल्ड सीन्स देणाºया या अभिनेत्रीने चित्रपटासाठी मिळालेली २५ लाख रूपये केवळ मसाज आणि शूजवर खर्च केले.

‘हेट स्टोरी-४’ची अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या तिच्या बोल्ड अंदाजामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचे ‘आशिक बनाया आपने’ हे गाणे खूप पसंत केले जात आहेत. ‘काबिल’ चित्रपटातील ‘हसीनों का दिवाना’ या आयटम सॉन्गमुळे उर्वशीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. असो, ‘हेट स्टोरी-४’ या चित्रपटाशी संबंधित उर्वशीबद्दल एक जबरदस्त खुलासा समोर येत आहे. जे वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या चित्रपटासाठी उर्वशीला २५ लाख रूपये इतकी फिस मिळाली. इंडस्ट्रीतील मोठ्या अभिनेत्रींच्या तुलनेत ही फिस खूपच कमी म्हणावी लागेल. परंतु उर्वशीने ती स्विकारली. परंतु या फिसचा तिने ज्यापद्धतीने वापर केला त्यावरून मोठ्या अभिनेत्रींच्याही भुवया उंचाविल्या असतील. होय, ‘हेट स्टोरी-४’ या चित्रपटाची शूटिंग तब्बल एक महिना लंडन येथे झाली. त्यामुळे याठिकाणी तिने केलेली उधळपटी अनेकांना धक्कादायक ठरली आहे. चित्रपटासंबंधी सूत्रांनी सांगितले की, जेव्हा लंडन येथे शूटिंग सुरू होती, तेव्हा उर्वशी दर आठवड्याला मसाज करण्यासाठी जात असे. या मसाजचा एकावेळचा खर्च तब्बल अडीच लाख रूपये होता. एवढेच काय तर उर्वशीने शूटिंगदरम्यान तब्बल ८५ शूज खरेदी केले. जेव्हा उर्वशी भारतात येण्यासाठी पॅकिंग करीत होती, तेव्हा तिचे शूज पॅक करणे एखाद्या आव्हानाप्रमाणे होते. उर्वशी हिच्याशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, तिच्याकडे तब्बल आठ आयफोन एक्स आहेत. आता यावरून तुमच्या लक्षात येईल की, उर्वशी रौतेला कशाप्रकारची लग्जरियस लाइफ जगते. वास्तविक उर्वशी अशाप्रकारचे आयुष्य जगू शकते, कारण तिच्या कमाईचा सोर्स केवळ चित्रपट नसून, मॉडलिंग क्षेत्रातही उर्वशीचा दबदबा आहे. उर्वशी सलमान खानच्या ‘रेस-३’ मध्ये स्पेशल अपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. तिचा ‘हेट स्टोरी-४’ हा चित्रपट ९ मार्च रोजी रिलीज होणार आहे.