Join us

फ्रेंच चित्रपटात २२ किस करणार राखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 11:59 IST

बॉलिवूडची ‘मिर्ची गर्ल’, ‘कॉन्ट्रोवर्सियल गर्ल’, ‘आयटम गर्ल’ कोण? तर राखी सावंत. छोटा पडदा, मोठा पडदा, रिअ‍ॅलिटी शो, नेतागिरी असे ...

बॉलिवूडची ‘मिर्ची गर्ल’, ‘कॉन्ट्रोवर्सियल गर्ल’, ‘आयटम गर्ल’ कोण? तर राखी सावंत. छोटा पडदा, मोठा पडदा, रिअ‍ॅलिटी शो, नेतागिरी असे सगळे करून झाल्यानंतर राखी सध्या काही वेगळे करण्याच्या मूडमध्ये आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राखी सध्या इंग्रजी भाषा शिकते आहे. यासाठी तिने खास शिकवणी वर्गही लावले आहेत. लवकरात लवकर इंग्रजीवर प्रभूत्व मिळवण्याचे तिचे प्रयत्न आहे.  केवळ इंग्रजीच नाही तर राखी सध्या फ्रेंचही शिकते आहे. पण कशासाठी? तर तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी.होय, लवकरच राखी एका फ्रेंच चित्रपटात झळकणार आहे.या फ्रेंच चित्रपटात राखी एका भारतीय मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भारतीय मुलगी विदेशात जाते खरी पण तिथे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राखी या भूमिकेसाठी अपार कष्ट घेत आहे.राखी याबद्दल म्हणते, ही भूमिका निश्चितपणे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. खरे तर ती स्वीकारण्याबाबत मी थोडी साशंक होते. कारण मला फार चांगली इंग्रजीही येत नाही आणि फ्रेंचही. पण तरीही हे आव्हान मी स्वीकारले. या दोन्ही भाषा मी सध्या शिकते आहे.राखी सावंत 
या फ्रेंच चित्रपटात राखीचे एक नाही, दोन नाही तर २२ किसींग सीन्स आहेत. आता ही बातमी खुद्द राखीनेच लीक केली आहे. अशा हॉट बातम्या लीक करून चर्चेत राहणे, हेच तर राखीचे वैशिष्ट्य आहे. राखी सध्या तेच करतेय. 
राखीने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेय. याशिवाय मॉडेल, डान्सर म्हणूनही ती दिसी आहे. पण आयटम गर्ल म्हणून राखीला खरी ओळख मिळाली.