Join us  

'मला अनेकांनी संधीसाधू म्हातारी म्हणून हिनवलं'; अर्जुनला डेट करण्यावरुन ट्रोल झालेली मलायका व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 1:02 PM

Malaika Arora:अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, दोघांच्याही वयातील अंतरामुळे अनेकदा मलायकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. यात तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या पर्सनल लाइफची सर्वाधिक चर्चा रंगतांना दिसते. अभिनेता अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. या जोडीने जाहीरपणे त्यांचं नातं मान्य केलं आहे. मात्र, दोघांच्याही वयातील अंतरामुळे अनेकदा मलायकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अलिकडेच एका मुलाखतीत मलायकाने तिला कशाप्रकारच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला याविषयी भाष्य केलं आहे. यात तिच्या वयापासून ते तिच्या स्वभावापर्यंत अनेकांनी तिला वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल केलं. 

'भारतात महिलांच्या रिलेशनशीपविषयी प्रत्येकाचाच चुकीचा गैरसमज आहे. जर एखादी स्त्री तिच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या पुरुषाला डेट करत असेल तर आपल्याकडे ते चुकीचं मानलं जातं. मलाही या गोष्टीचा सामना करावा लागला. मला तर अनेकांनी संधीसाधू म्हातारी वगैरे म्हणून हिनवलंदेखील', असं मलायका म्हणाली.

नेमकं काय म्हणाली मलायका?

"ब्रेकअप किंवा घटस्फोटानंतर स्त्रियांनी स्वतंत्र विचाराने जगणं खूप गरजेचं आहे. पण, आपल्या देशात स्त्रियांना धरुन एक विचित्र समज आहे. त्यामुळे एखाद्या स्त्रीने कमी वयाच्या मुलाला डेट केलं तर ते चुकीचं मानलं जातं. त्यामुळेच मी दररोज स्वत:ला आणखी कणखर आणि मानसिकरित्या फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. ट्रोलिंग तर सतत होतच असतं. पण, यावर मी मात करायचा प्रयत्न करते", असं मलायका म्हणाली.

पुढे ती म्हणते, "दुर्दैवाने आपण अशा समाजात राहतो तो काळानुसार प्रगती करण्यास तयार होत नाही. आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत रोमांन्स करणाऱ्या पुरुषाचं इथे कौतुक केलं जातं. पण, हेच महिलांच्या बाबतीत उलटं झालं तर तिला ट्रोल केलं जातं. इतकंच नाही तर स्त्रीने असं केलं तर तिला संधीसाधू, डेस्परेट म्हातारी," असं म्हणत हिनवलं जातं.

दरम्यान, मलायका आणि अर्जुन या जोडीला अनेकादा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. अर्जुन मलायकापेक्षा बराच लहान आहे. त्यामुळे या जोडीला कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मलायकाने लग्नाच्या १९ वर्षानंतर अरबाज खानपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटीअर्जुन कपूरसिनेमा