Join us  

उर्वशी रौतेलाला मिळालं लोकसभेचं तिकिट, कोणत्या पक्षाने दिली उमेदवारी? म्हणाली, "मला तिकीट ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:36 AM

उर्वशी रौतेलानेही तिला तिकीट मिळाल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उर्वशी राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. उर्वशी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. देशात सगळीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अनेक कलाकारही राजकीय पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच आता उर्वशीच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उर्वशी राजकीय प्रवासाला सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे. 

लोकसभा निवडणुकींसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता उर्वशी रौतेलानेही तिला तिकीट मिळाल्याचं जाहीर केलं आहे. उर्वशीने 'इन्स्टंट बॉलिवूड'ला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे. उर्वशी सध्या तिच्या आगामी 'JNU-जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिला राजकारणातील एन्ट्रीवर प्रश्न विचारण्यात आला. उर्वशी म्हणाली, "मला तिकीट मिळालं आहे. पण, मी अजून निर्णय घेतलेला नाही." याबरोबरच राजकारणात एन्ट्री घ्यायची की नाही, याबाबत उर्वशीने चाहत्यांचं मत विचारलं आहे. 

उर्वशीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. "तिकीट मिळाल्यानंतर राजकारणात एन्ट्री घेणारी ही पहिलीच महिला असेल", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "आता देशाचं काय होणार", असंही म्हटलं आहे. "बॉलिवूडमध्ये करिअर नाही झालं तर आता राजकारणात करणार का?", "राजकारणात येऊन काय करणार?" अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

उर्वशी रौतेला मुख्य भूमिकेत असलेला 'JNU-जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' हा सिनेमा येत्या ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. कॉलेज विद्यार्थ्यांची रोमँटिक नव्हे तर राजकीय विचारधारेची बाजू या सिनेमातून मांडण्यात आली आहे. या सिनेमात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही झळकणार आहे. तर अभिनेत्री रश्मी देसाईदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेलाराजकारणसिनेमा