Join us

बॉलिवूड गाजवणाऱ्या परवीन बाबींच्या बायोपिकमध्ये ही लोकप्रिय अभिनेत्री झळकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 11:27 IST

८०-९० चा काळ गाजवणाऱ्या परवीन बाबींच्या बायोपिकमध्ये सध्याची आघाडीची लोकप्रिय अभिनेत्री झळकणार असल्याची शक्यता आहे (tripti dimri)

परवीन बाबी या बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री होत्या. ग्लॅमरस भूमिकांनी परवीन बाबींनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. 'अमर अकबर एन्थनी', 'मजबूर', 'त्रिमूर्ती', 'खट्टा मिठा' अशा सिनेमांमधून परवीन बाबींनी (paarven babi)  बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं होतं. याच दिग्गज अभिनेत्री परवीन बाबीवर बायोपिक येत असून बॉलिवूडची सध्याची आघाडीची ही भूमिका साकारणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. 

परवीन बाबीच्या बायोपिकसाठी तृप्तीचं नाव चर्चेत

फिल्मफेअर रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरी परवीन बाबी यांच्या बायोपिकमध्ये झळकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तृप्ती परवीन बाबी यांची प्रमुख भूमिका करणार असल्याची चर्चा आहे. या भूमिकेसाठी विविध अभिनेत्रींच्या नावाची चर्चा आहे. पण यात तृप्तीचं नाव प्रामुख्याने घेतलं जातंय. अजूनतरी या बायोपिकमध्ये कोण भूमिका साकारणार याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तृप्तीशिवाय उर्वशी रौतेला परवीन बाबींची भूमिका साकारणार, असंही सांगण्यात येतंय. आता याविषयी खरं काय ते लवकरच सर्वांना कळेलच. 

तृप्ती डिमरीचं वर्कफ्रंट

परवीन बाबींच्या बायोपिकमध्ये तृप्ती झळकणार की नाही  याचा खुलासा लवकरच होईल. आपल्या सर्वांना माहितच आहे परवीन बाबींनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता. ८०-९० च्या काळात त्यांनी बॉलिवूडमधील प्रमुख नायकांसोबत काम करुन एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. तृप्तीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर अलीकडेच तिचा 'बॅड न्यूज' सिनेमा रिलीज झाला. तृप्ती आता लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'भूल भूलैय्या ३' सिनेमात झळकणार आहे.

 

टॅग्स :परवीन बाबीतृप्ती डिमरीआत्मचरित्र