Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमधल्या 'या' नायिकांनी केले ब्रेस्ट इम्प्लान्ट

By admin | Updated: April 13, 2016 11:46 IST

बॉलिवू़डमध्ये आज अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी छातीचे सौदर्य वाढवण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया केली आहे. या कृत्रिम शस्त्रक्रियेव्दारे छातीचा भाग आकर्षक करता येतो.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १३ - बॉलिवूडमध्ये काम करणा-या अभिनेत्री आपली फिगर आणि सौदर्याबद्दल प्रचंड सर्तक असतात. जरा जरी वजन वाढले तरी त्यांच्या जिमच्या फे-या सुरु होतात. मूळात जे सौदर्य मिळाले आहे ते अधिक खुलवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. यासाठी सौंदर्यप्रसाधनांच्या वापराबरोबर वेळप्रसंगी शस्त्रक्रियाचाही आधार घेतला जातो. 
 
बॉलिवू़डमध्ये आज अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी छातीचे सौदर्य वाढवण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया केली आहे. या कुत्रिम शस्त्रक्रियेव्दारे छातीचा भाग आकर्षक करता येतो. काही अभिनेत्रींनी ही शस्त्रक्रिया केल्याचे मान्य केले तर, काहींनी मात्र नाकारले. अभिनेत्री आयशा टाकीयाने दोन दिवसापूर्वीच तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला.
 
२००४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने लगेचच ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमुळे ती चर्चेत आली होती. आयशाने स्वत: कधीही ही शस्त्रक्रिया केल्याचे मान्य केले नाही. मात्र तिचे फोटो याबद्दल बरेच काही सांगून जातात.
 
कंगना राणावत, बिपाशा बासू, श्रीदेवी, राखी सावंत आणि मल्लिका शेरावत या अभिनेत्रींनीही ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया करुन छातीचे सौदर्य खुलवल्याचे बोलले जाते.