राजेश खन्ना यांची कथित गर्लफ्रेंड अनीता अडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजेश खन्ना यांच्यासोबत असलेल्या नात्याला लग्नाचं नाव द्यावं, यासाठी अनिता अडवाणीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. डिंपल कपाडिया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर कोर्टाने अनीता अडवाणीची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे अनिता अडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजेश खन्नांसोबत लिव्ह इनमध्ये राहत होते असा दावाही अनिताने केला होता. इतकंच नव्हे तर आम्ही सगळ्यांशी लपवून लग्नही केलं होतं, असंही तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
अनिता अडवाणीने मेरी सहेलीला दिलेल्या मुलाखतीत राजेश खन्नांसोबतच्या नात्याबाबत भाष्य केलं होतं. या मुलाखतीत तिने राजेश खन्नांसोबत लग्न केल्याचा गौप्यस्फोटही केला होता. "आम्ही लग्न केलं होतं. पण इंडस्ट्रीमध्ये या गोष्टीबाबत कोणीही बोललं नाही. आम्ही चांगले मित्र आहोत किंवा रिलेशनशिपमध्ये आहोत, असंच सगळे म्हणायचे. पण मीडियामध्ये हे कळलं होतं की आम्ही एकत्र राहत आहोत. त्यामुळेच लग्नाची घोषणा करण्याची गरज आम्हाला वाटली नाही. आमच्या घरात एक छोटं मंदिर होतं. मी सोन्याचं मंगळसूत्र बनवून घेतलं होतं. ज्यामध्ये काळे मणी होते. राजेश खन्नांनी माझ्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलं. त्यानंतर त्यांनी भांगात कुंकू भरलं. आणि ते म्हणाले की आजपासून तू माझी जबाबदारी आहेस", असं अनिता अडवाणीने सांगितलं होतं.
२०१२ मध्ये राजेश खन्नांचं कॅन्सरने निधन झालं. शेवटच्या क्षणापर्यंत राजेश खन्नांपर्यंत असल्याचंही अनिताने सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर जेव्हा राजेश खन्नांना कॅन्सरचं निदान झालेलं तेव्हाही सोबत असल्याचा दावा अनिताने केला होता. मात्र, राजेश खन्नांच्या अंत्यसंस्कारावेळी अनिता यांना कुटुंबीयांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. राजेश खन्ना यांनी १९७३ मध्ये डिंपल कपाडियासोबत लग्न केलं होतं. मात्र दहा वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली आहेत.
Web Summary : Anita Advani claims she secretly married Rajesh Khanna. She revealed they married in a small ceremony. After Khanna's death, his family allegedly excluded her.
Web Summary : अनीता आडवाणी का दावा है कि उन्होंने राजेश खन्ना से चुपके से शादी की थी। उन्होंने बताया कि उनकी शादी एक छोटे समारोह में हुई थी। खन्ना की मृत्यु के बाद, उनके परिवार ने कथित तौर पर उन्हें बाहर कर दिया।