Join us  

उत्तराखंड बोगद्यातील ४१ मजुरांची सुखरुप सुटका; वाचा, काय म्हणाले बॉलिवूड कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:19 PM

४१ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर अक्षय कुमार ते जॅकी श्रॉफपर्यंत बॉलिवूड कलाकारांनी आनंद व्यक्त केला.

उत्तरकाशीच्या बोगद्यात १७ दिवसांपासून अडकलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी ही घटना घडली होती. तेव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.  मजूरांना सुखरुप बाहरे काढण्यात १७ व्या दिवशी यश आले आहे.  अक्षय कुमार, रितेश देशमुख, अनुपम खेर अभिषेक बच्चनपासून ते जॅकी श्रॉफपर्यंत या बॉलिवूड कलाकारांनी आनंद व्यक्त केला. 

अक्षय कुमारने बोगद्यातून परतणाऱ्या मजुरांचे फोटो शेअर केला. त्याने लिहले की, '४१ अडकलेल्या मजूरांना वाचवल्याबद्दल मला खूप आनंद आणि दिलासा मिळाला आहे. बचाव पथकातील प्रत्येक सदस्याला माझा सलाम. तुम्ही सर्वांनी मिळून खूप छान काम केले. हा नवा भारत आहे आणि आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटतो. जय हिंद'.

उत्तराखंड बोगद्यातून बाहेर पडलेल्या कामगारांबद्दल अभिषेक बच्चन म्हणाला,  'उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी सर्व बचाव कर्मचार्‍यांचे आणि सर्व एजन्सींचे आभार आणि मोठा सलाम. जय हिंद.' 

तर रितेश देशमुखने बचाव कार्याचा फोटो ट्विटवर शेअर केला आहे. त्याने लिहले, 'ब्रावो!!! गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या बचाव पथकाला सलाम. कुटुंबांच्या आणि देशाच्या प्रार्थनांचं हे फळ...गणपती बाप्पा मोरया'

अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीदेखील एजन्सींचे आभार मानले. त्यांनी लिहले,  'उत्तरकाशी बोगद्यातून सर्व ४१ कामगारांची सुटका करण्यात आली. NDRF, BRO, भारतीय सेना, भारतीय वायुसेना, NHIDCL, SJVNL, THFCL, RVNL, ONGC, कोल इंडिया आणि इतरांसह बचाव कार्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या २२ एजन्सींचे मनापासून आभार '.

याशिवाय, बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीही उत्तरकाशी टनल रेस्क्यूचा फोटो शेअर केला.  'भारत माता की जय', असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले.  

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसेलिब्रिटीउत्तराखंडअभिषेक बच्चनजॅकी श्रॉफअनुपम खेररितेश देशमुख