Zayed Khan: फराह खान दिग्दर्शित 'मैं हू ना' या चित्रपटातून अभिनेता जायेद खान (Zayed khan) प्रसिद्धीझोतात आला. हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जायेदसह शाहरुख खान, सुनील शेट्टी, सुष्मिता सेन आणि अमृता राव अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. जायदने मैं हू ना मध्ये शाहरुखचा ऑनस्क्रीन भाऊ लक्ष्मणची भूमिका साकारली होती. हा सिनेमा अभिनेत्याच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरला.परंतु, जायेद खान बऱ्याच काळापासून पडद्यावर दिसला नाही, यावर अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि प्रवासाबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
नुकतीच जायेद खानने सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील कटू आठवणी शेअर केल्या. त्यादरम्यान बोलताना जायेदने त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना कसा करावा लागला, असंही म्हटलं. तेव्हा अभिनेता म्हणाला, "त्यावेळी टिपू सुलतान चित्रपटाचे चित्रीकरण करताना आगीची दुर्घटना घडली. सेटवरील त्या आगीत माझे वडील जखमी झाले. त्या आगीमध्ये बरेच लोक मृत्यूमुखी पडले होते. शिवाय त्याकाळी कोणताही विमा नव्हता. त्यामुळे घरच्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. त्यावेळी घरी आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली होती. तेव्हा माझ्या बहिणी आणि आईची अवस्था बघून मी खूप दु: खी झालो होतो. त्या अपघातानंतर मोठं आर्थिक संकट आमच्यावर ओढावलं होतं."
त्यानंतर अभिनेत्याने कठीण काळातील आठवणी शेअर करत म्हणाला, "त्यावेळी आम्ही गाड्या विकल्या, घर गहाण ठेवलं. अशा पडत्या काळात आपलं कोण असतं, हे कळतं. पण, कालांतराने आमची परिस्थिती सुधारली. आम्ही घर परत मिळवलं आणि नवीन गाड्या देखील खरेदी केल्या. याशिवाय, जेव्हा मला पहिल्या चित्रपटातून मानधन मिळालं तो चेक मी आईला दिला."
वर्कफ्रंट
जायेद खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने २००३ मध्ये 'चुरा लिया है तुमने' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु त्याला खरी ओळख शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'मैं हूं ना' मधून मिळाली. त्यानंतर जायदने 'दस', 'शब्द', 'फाइट क्लब' आणि युवराज यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यानंतर झायेदने दस, शब्द, फाईट क्लब आणि युवराज सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सध्या जायेद खानने फिल्म इंडस्ट्रीपासून दूर एक बिझनेसमन म्हणून ओळख निर्माण केली आहे.