Join us  

संजय मिश्रांच्या दोन लेकींना पाहिलंत का? दिसायला खुपच क्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 1:26 PM

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय मिश्रांनी पहिल्यांदाच त्यांच्या दोन मुलींचे फोटो शेअर केलेत (Sanjay Mishra Daughter)

संजय मिश्रा (Sanjay Mishra) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. वयाच्या ५९ व्या वर्षी संजय बॉलिवूडमध्ये विविध भूमिका करण्यासाठी लोकप्रिय आहेत. संजय हे सोशल मीडियावरही सक्रीय असतात. संजय यांनी कधी विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं तर कधी गंभीर भूमिका साकारुन लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं. आपल्या कुटुंबाबात संजय जाहीरपणे कमी बोलताना दिसतात. अशातच संजय यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मुलींचा चेहरा दाखवला आहे.

संजय मिश्रांचा त्यांच्या दोन मुलींसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. संजय यांना पल आणि लम्हा अशा दोन मुली आहेत. फोटोत पाहायला मिळतं की संजय आणि त्यांच्या दोन मुली रिक्षात बसलेल्या दिसत आहेत. या दोघी कॅमेरात बघत असून संजय मागे विनोदी पोज देताना दिसत आहेत. संजय यांच्या लेकींचा क्यूटनेस पाहून फॅन्सनी त्यांना चांगलीच पसंती दिलीय.

संजय मिश्रा यांनी बॉलिवूडमध्ये आजवर १०० हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केलाय. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण अशा अनेक सुपरस्टार्ससोबत संजय यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. संजय यांची प्रमुख भूमिका असलेले 'आँखो देखी', 'कामयाब', 'वध' असे सिनेमेही बॉक्स ऑफीसवर प्रचंड गाजले. 

टॅग्स :संजय मिश्राशाहरुख खानअजय देवगणअक्षय कुमार