Join us  

दरवाजा तोडून बाहेर काढावा लागला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह; मृत्यूचं खरं कारण गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 5:30 PM

Guru dutt: गुरु दत्त बेडवर पडले होते आणि त्यांच्या तोंडातून फेस आला होता. तसंच त्यांच्या जवळ एक काचेची बाटली सापडली ज्यात गुलाबी रंगाचा द्रव होता.

कलाविश्वात सध्याच्या घडीला असंख्य कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. त्यामुळे या कला विश्वात कोणतीही घटना घडली तरी ती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरते. कोणाचं प्रेम प्रकरण असो, कॉन्ट्रोवर्सी असो वा एखाद्या दिग्गज व्यक्तीचं निधन असो. येथील प्रत्येक गोष्ट चर्चिली जाते. सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्याचं निधन झाल्यानंतर त्याचा मृतदेह चक्क दरवाजा तोडून बाहेर काढावा लागला होता.

सिनेमाचं चालतं बोलतं विद्यापीठ या नावाने प्रसिद्ध असलेला दिवंगत अभिनेता म्हणजे गुरुदत्त. उत्तम अभिनयासह गुरु दत्त यांनी लेखन,दिग्दर्शन आणि निर्मिती य क्षेत्रातही यशस्वीरित्या कामगिरी केली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये त्यांचं नाव कायम आदराने घेतलं जातं. मात्र, या अष्टपैलू अभिनेत्याचा मृत्यू दुर्दैवीरित्या झाला. वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झालेल्या गुरु दत्त यांचा मृत्यू आजही अनेकांसाठी गूढ आहे.

काय घडलं त्या रात्री

गुरु दत्त यांच्या मृत्यूविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. काहींच्या मते, त्यांनी आत्महत्या केली आहे.  परंतु, सत्य कोणालाच माहित नाही. गुरु दत्त यांच्या मृत्यूविषयी त्यांचे जवळचे मित्र लेखक अबरार अल्वी यांनी त्यांच्या 'टेन इयर्स विथ गुरू दत्त' या पुस्तकात नमूद केलं आहे. त्यामुळे गुरु दत्त यांच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय घडलं हे समोर आलं.

९ ऑक्टोबर  १९४६  या दिवशी गुरु दत्त आर्क रॉयलमध्ये बहारे फिर भी आएंगी या सिनेमातील नायिकेच्या मृत्यूच्या सीनवर काम करत होते. यावेळी ते नशेमध्ये पूर्ण बुडाले होते. इतकंच नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसून येत होता. त्यांची ही अवस्था पाहून अबरार यांनी गुरु दत्त यांच्या हेल्परला रतनला काही झालंय का? असं विचारलं. त्यावर गुरु दत्त आणि त्यांची पत्नी गीता दत्त यांच्यात वाद सुरु असल्याचं रतनने सांगितलं. 

दिव्या भारती ते श्रीदेवी! बॉलिवूडच्या 5 अभिनेत्री ज्यांच्या मृत्युचं गूढ आजही आहे कायम

या नवरा-बायकोमधला वाद प्रचंड विकोपाला गेला होता. ज्यामुळे गीता दत्त त्यांच्या दोन्ही मुलांनी घेऊन घर सोडून गेल्या होत्या. त्यामुळे मृत्यूच्या आदल्या रात्री गुरु दत्त यांनी गीता यांना फोन करुन मुलांना माझ्याकडे पाठव असं सांगितलं होतं. ज्यावर गीता यांनी नकार दिला होता. त्यामुळे  रागाच्या भरात 'जर मला मुलांना पाहायला मिळालं नाही तर तू माझं मेलेलं प्रेत पाहशील', असं गुरु दत्त यांनी गीताला म्हटलं होतं. विशेष म्हणजे त्याच रात्री गुरु दत्त यांचा मृत्यू झाला.

दारुमुळे गमावला जीव?

रागाच्या भरात असलेल्या गुरु दत्त यांनी त्या रात्री बरीच दारू प्यायली होती. त्यांची ही अवस्था पाहता अबरार यांनी गुरूला 'मला तुझ्याशी बोलायचं आहे', असं सांगितलं पण 'मला झोप आली' असल्याचं सांगून त्यांनी टाळलं. गुरू दत्त नेहमीच लेखन, सीन्स, संवाद झाल्यावर ते पाहायचे त्यात काही बदल करायचे असल्यास अबरारला सांगायचे पण त्या रात्री त्यांनी असं काहीच न करता थेट झोप आल्याचं सांगून बेडरुममध्ये गेले. रात्री ३ वाजता त्यांनी रतनकडे विस्की मागितली होती. परंतु, रतनने नकार दिला. ज्यामुळे ते स्वत: उठून गेले आणि दारुची मोठी बाटली घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० ऑक्टोबरला त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली.

रात्री 3 वाजता गुरू दत्त त्यांच्या रूममधून बाहेर आले आणि त्यांनी हेल्पर असलेल्या रतनला विस्की देण्यासाठी सांगितलं पण रतननं विस्की देण्यास नाही म्हटल्यावर गुरू दत्तनी दारूची संपूर्ण बाटली घेऊन बेडरूममध्ये गेले. त्यानंतर बेडरूममध्ये काय झालं हे कोणालाही माहिती नाही. 10 ऑक्टोबरलाच्या सकाळी गुरूदत्त बेडरूममध्ये मृतास्थेत सापडले.

दरवाजा तोडून काढला मृतदेह बाहेर

१० ऑक्टोबर रोजी सकाळी गुरु दत्तला पाहण्यासाठी डॉक्टर आले होते. मात्र, तो झोपलाय असं समजून ते परत निघून गेले. याच दरम्यान गीता सातत्याने रतनला फोन करुन गुरु दत्तची चौकशी करत होती. मात्र, ते झोपलेत सांगून रतन फोन ठेवत होता. अखेर ११ वाजता गीता, गुरु दत्त यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांनी  रतनला बेडरुमचा दरवाजा तोडायला लावला. ज्या क्षणी दरवाजा तोडला त्यावेळी गुरु दत्त बेडवर पडले होते आणि त्यांच्या तोंडातून फेस आला होता. तसंच त्यांच्या जवळ एक काचेची बाटली सापडली ज्यात गुलाबी रंगाचा द्रव होता. त्यांची ही अवस्था पाहता गुरु दत्त यांचा मृत्यू झाला नसून त्यांनी आत्महत्या केली आहे, असं अबराम यांचं म्हणणं होतं.

टॅग्स :गुरू दत्तबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी