Join us

शमिता शेट्टीला आजही होतो या एका गोष्टीचा पश्चाताप... वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 08:00 IST

आज शमिताचा वाढदिवस....

शिल्पा शेट्टीने अपार यश मिळवले. पण तिच्या तुलनेत तिची बहीण शमिता शेट्टी अपयशी ठरली. 2000 मध्ये ‘मोहब्बते’ चित्रपटातून शमिताने बॉलिवूड डेब्यू केला. ‘मोहब्बते’ हिट झाला पण शमिता मात्र याचा फार काही लाभ झाला नाही. यानंतर ती काही चित्रपटात दिसली आणि आली तशी गायब झाली. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे, आज शमिताचा वाढदिवस.

चित्रपटांत डाळ शिजत नाही म्हटल्यावर शमिताने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. बिग बॉस 3, खतरों के खिलाडी 9, झलक दिखला जा 8 अशा काही रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक बनून आली. पण यापश्चातही शमिताला यशाने हुलकावणी दिली. आज शमिताची ओळख आहे, ती केवळ शिल्पा शेट्टीची बहीण म्हणून. खरे तर शमिताला तिचीच एक चूक नडली. चुकीच्या निर्णयाने तिचे करिअर संपले. होय, खुद्द शमिताने एका मुलाखतीत हे सांगितले होते.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती पर्सनल व प्रोफेशनल लाईफवर बोलली होती. बहिणीसोबत होणा-या तुलनेवरही ती बोलली होती. ती म्हणाली होती, ‘ मी एका हिट चित्रपटाने करिअरची सुरुवात केली. पण दुर्दैवाने माझे करिअर माझ्या अपेक्षेनुसार चालले नाही. याचे कारण मी स्वत: आहे. ज्यावेळी माझ्याकडे काम होते, त्यावेळी मी ते करायला नकार दिला. मी अतिचोखंदळ झाले. ही माझी चूक होती. पण ही चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. इंडस्ट्रीतील नियम पाळले असते...‘काश...’  मी आणखी काम केले असते....’

आजही मला लोक शिल्पा शेट्टीची बहीण म्हणून ओळखतात. कधी कधी तर मला शिल्पा म्हणून हाक मारतात. कारण मी तिच्यासारखी दिसते. पण याचे मला कधीच वाईट वाटले नाही. शिल्पासारख्या एका यशस्वी व्यक्तिसोबत माझी तुलना होत असेल तर मी स्वत:ला भाग्यशाली समजते, असेही शमिता म्हणाली होती.

टॅग्स :बॉलिवूडशिल्पा शेट्टी