दुनियादारी, क्लासमेट, दगडी चाळ अशा चित्रपटातून अभिनेता अंकुश चौधरी याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. फार कमी लोकांना माहित आहे की, अंकुश चौधरीची पत्नी देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री म्हणजे दिपा परब. अंकुश चौधरी आणि दिपा परब २००७ साली लग्नबेडीत अडकले. त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा आहे. अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे.
कॉलेजच्या दिवसात अंकुश आणि दिपा यांची एकमेकांशी ओळख झाली. ते दोघे एमडी म्हणजे महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी असून त्या दोघांचं प्रेम एकच आहे ते म्हणजे अभिनय आणि रंगभूमी. कॉलेजमध्ये असताना ते दोघेही एकांकिकामध्ये काम करत होते. त्याचदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. करियर केल्यानंतरच लग्न करायचे असे त्या दोघांनी ठरवले. दिपा आणि अंकुश यांचा २३ नोव्हेंबर २००६ रोजी साखरपुडा पार पडला. अंकुश आणि दिपा हे दोघे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार असले त्यांनी त्यांचा साखरपुडा त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवला होता. मीडियाला देखील याविषयी अनेक दिवसांनंतर कळले. २००७ साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.