Join us

बिपाशाला करावा लागला मेकअप

By admin | Updated: August 22, 2014 22:58 IST

अ भिनेत्री त्यांच्या प्रत्येक चित्रपटात हेवी मेकअप करीत असतात, त्यात काहीच नवे नाही; पण बिपाशाने तिच्या क्रि एचर थ्रीडी या चित्रपटात मेकअप न करण्याचा निर्णय घेतला होता.

अ भिनेत्री त्यांच्या प्रत्येक चित्रपटात हेवी मेकअप करीत असतात, त्यात काहीच नवे नाही; पण बिपाशाने तिच्या क्रि एचर थ्रीडी या चित्रपटात मेकअप न करण्याचा निर्णय घेतला होता. शूटिंगरदरम्यान मात्र तिला तिचा  निर्णय मागे घ्यावा लागला. याबाबत सूत्रंनी सांगितले की, उटीमधील शूटिंग शेडय़ुल्डदरम्यान बिपाशाला उटीच्या जंगलांमधून घाबरून पळण्याचा एक सीन करायचा होता. या सीनचे शूटिंग सुरू होताच, 
ती अडखडून खाली पडली. त्यामुळे तिच्या चेह:यावर जखमा झाल्या. आता या जखमांमुळे शूटिंगमध्ये येणा:या समस्यांचा विचार करीत बिपाशाने चेह:यावर हेवी मेकअप केला. मेकअपच्या साहाय्याने या जखमा लपवण्यात आल्या. याबाबत बिपाशाला विचारले तेव्हा ती म्हणाली की, ‘माङयासाठी अॅक्शन आणि स्टंट सीन शूट करणो नेहमीच मजेदार असते.