Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील ‘या’ बर्थ डे गर्लला ओळखलंत का? अक्कीसोबत केला होता धमाकेदार डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 12:36 IST

Bollywood Throwback : फोटोतील या चिमुकलीचा आज बर्थ डे आहे. होय, फोटोतील या चिमुकलीने मोठी झाल्यावर बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि अख्खी इंडस्ट्री गाजवली..

फोटोतील या चिमुकलीचा आज बर्थ डे आहे. होय, फोटोतील या चिमुकलीने मोठी झाल्यावर बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि अख्खी इंडस्ट्री गाजवली होती. अक्षय कुमार सारख्या सुपरस्टारसोबत तिचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. याऊपरही तुम्ही फोटोतील या चिमुलीला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो.ही चिमुरडी दुसरी तिसरी कुणी नसून बिपाशा बासू आहे. आज बिपाशा फिल्म इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह नसली तरी एकेकाळी ती बॉलिवूडच्या हॉट अ‍ॅक्ट्रेसच्या यादीत सर्वात टॉपवर होती.

7 जानेवारी 1979 रोजी दिल्लीत तिचा जन्म झाला. साधारण रूप घेऊन जन्मास आलेल्या बिपाशाने वयाच्या 16 वर्षीय मॉडेलिंग सुरु केली होती. याच वयात तिने गोदरेज सिंथॉल सुपर मॉडेल कॉन्टेस्ट जिंकला. यानंतर बिप्सने अनेक मॉडेलिंग असाईनमेंट्स केल्यात आणि मग ती बॉलिवूडमध्ये आली.बिपाशाचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील नेहरु प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय कोलकातामध्ये शिफ्ट झाले. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.

2001 साली बिपाशा बासूने ‘अजनबी’ या मल्टिस्टारर सिनेमातून डेब्यू केला होता. यात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. करिना कपूर व बॉबी देओल यांच्याही यात भूमिका होत्या. बिपाशाच्या या डेब्यू सिनेमाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. पण हा फ्लॉप नव्हता. बिपाशाने या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यूचा फिल्मफेअर अवार्डही जिंकला होता.

 ‘राज’ या सिनेमानंतर बिपाशा ख-या अर्थाने स्टार झाली. यानंतर तिने अनेक सिनेमात काम केलं. लग्नानंतर बिपाशा चित्रपटांपासून दूर आहे. 2015 मध्ये तिचा ‘अलोन’ हा सिनेमा रिलीज झाला होता. तेव्हापासून ती सिनेमात दिसलेली नाही. याच चित्रपटाच्या शूटींगदरम्यान ती करण सिंग ग्रोव्हरच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्नगाठ बांधली. गतवर्षी बिपाशाची ‘डेंजरस’ ही वेबसीरिज रिलीज झाली होती.

टॅग्स :बिपाशा बासूबॉलिवूड