Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दंगल गर्ल’चा बिकिनी अंदाज!

By admin | Updated: June 10, 2017 00:54 IST

फातिमा सना शेख हिचा जगासमोर असा काही अवतार आला की, सर्वच दंग राहिले आहेत. ‘दंगल’मध्ये आखाड्यात भल्याभल्यांना चित करणारी

फातिमा सना शेख हिचा जगासमोर असा काही अवतार आला की, सर्वच दंग राहिले आहेत. ‘दंगल’मध्ये आखाड्यात भल्याभल्यांना चित करणारी सना समुद्रकिनारी स्विमसूटमध्ये आग लावताना दिसत आहे. सनाचा हा अवतार या अगोदरच कधीच बघावयास मिळाला नसल्याने सगळ्यांनाच त्याचे आश्चर्य वाटत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो एका मॅगझिनच्या जून एडिशनसाठी शूट केले आहेत. खरं तर फातिमा नेहमीच तिचे फोटो इन्स्टावर शेअर करीत असते. परंतु यावेळेस तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूपच बोल्डनेस असल्याने ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. फातिमा सध्या आमिरच्याच ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात आमिर आणि फातिमा व्यतिरिक्त महानायक अमिताभ बच्चन आणि कॅटरिना कैफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.