Join us
Daily Top 2Weekly Top 5

 Bigg Boss Marathi : काही तासांत ठरणार ‘बिग बॉस मराठी’चा विजेता! शर्मिष्ठा राऊत सहा फायनलिस्टमधून बाद!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 19:55 IST

 वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रीय शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

 वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रीय शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस मराठी’ कळायला अगदी काही मिनिटांचा अवकाश उरलाय.  मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, स्मिता  गोंदकर असे सहा स्पर्धक ग्रॅण्ड फिनालेमध्ये आहेत. यापैकी  पहिल्या बाद फेरित शर्मिष्ठा राऊत बाद झाली. त्यामुळे आता केवळ पाच फायनलिस्ट उरलेत. यात मेघा आणि पुष्कर या दोघांचे पारडे जड मानले जात आहे. 

पहिल्या आठवड्यापासूनच मेघा ही ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात आहे. किंबहुना शो जिंकायचाच याच महत्त्वाकांक्षेने मेघा या घरात आली होती. सुरुवातीपासूनच या दूरदृष्टीने मेघाचा खेळ सुरू होता. ‘बिग बॉस’च्या १०० दिवसांच्या वास्तव्यात मेघावर अनेक आरोप झालेत. ती बडबडी आहे, ती खोटारडी आहे, ती अप्रामाणिक आहे, असे अनेक आरोप तिने झेलले. ज्या सई व पुष्कर या ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या सर्वाधिक जवळच्या मित्रांनीही तिच्यावर हे आरोप केलेत. पण मेघा या आरोपांना पुरून उरली. मेघा, तू ‘बिग बॉस’च्या घरात जान आणलीस, हे महेश मांजरेकर यांचे शब्द तिने अक्षरश: खरे ठरवलेत. पुष्कर हाही या शोच्या विजेत्यांमधील एक महत्त्वाचा दावेदार आहे.आता काही तासांतच बिग बॉसच्या विजेत्याचे नाव समोर येणार आहे.

 

 

टॅग्स :बिग बॉस मराठी