Join us

'पंढरपूरला आलो की..', विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताच आजोबांच्या आठवणीत उत्कर्ष भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 16:30 IST

Utkarsh shinde: 'बिग बॉस'फेम उत्कर्ष शिंदे याने अलिकडेच पंढरपुराला भेट दिली असून या मातीत गेल्यानंतर आजोबांच्या आठवणीत तो भावुक झाला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या जय घोषात दुमदुमत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाले आहेत. या आषाढी वारीसाठी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला आहे. यात खासकरुन काही कलाकारांनी त्यांना आलेला वारीचा अनुभव शेअर केला. यामध्येच  आता 'बिग बॉस'फेम उत्कर्ष शिंदे याने अलिकडेच पंढरपुराला भेट दिली असून या मातीत गेल्यानंतर आजोबांच्या आठवणीत तो भावुक झाला आहे.

"दोन वर्षाचा लॉकडाऊन, हॉस्पिटल,पेशंट, घरात काढलेले दिवस आणि आपल्याच गावी आपणच जाऊ शकत नाही. ना आपल्या गावची वारी पाहू शकतो. ह्या गोष्टींच दुःख आज कमी झालं. शूटिंगनिमित्त गावी आलो मंगळवेढे इथे आजच शूटिंग संपवून सहकार्यांच्या हट्टापायी सर्वाना पंढरपूर दर्शनास घेऊन आलो. पंढरपूरला भेट देण्याचा योग आज आला. आणि, पाऊल ठेवेल तिथे मान सन्मान हार गळ्यात पडत होते. आणि त्यातच आजोब प्रल्हाद शिंदेचे स्वर कानी पडू लागले "पाऊले चालती पंढरीची वाट". स्वतःला धन्य मानतो ह्या गावचा ह्या तालुक्याचा ह्या मातीतला मी आणि इकडची पहाट त्याच प्रल्हाद शिंदेंच्या सुराने सुरु होते. ह्या उपर एका नातवाला काय हव?, जिथून तिथून आपल्याच आजोबांचा आवाज कानी पडतो. आपले आजोबा आपल्या सोबत सदैव आहेत ह्याची प्रचिती पंढरपूरला आलो कि झाल्याशिवाय राहत नाही", अशी पोस्ट उत्कर्षने शेअर केली आहे.

दरम्यान, या पोस्टमध्ये त्याने विठ्ठलाच्या चरणी लीन झाल्यावर कसं मन प्रसन्न होतं हे सांगायचा प्रयत्न केला. तसंच आजोबासोबत नसले तरीदेखील त्यांच्या गाण्यातून ते सदैव आपल्यासोबत आहेत हेदेखील सांगितलं. ही पोस्ट शेअर करत त्याने इन्स्टाग्रामवर त्याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीबिग बॉस मराठीपंढरपूर