Join us

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातील सदस्यांकडून प्रसादला केलं जातेय टार्गेट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 15:05 IST

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यापासून प्रसादला सदस्यांकडून कुठल्या न कुठल्या गोष्टीवरून वाद होतंय.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यापासून प्रसादला सदस्यांकडून कुठल्या न कुठल्या गोष्टीवरून ऐकावं लागतं आहे, मग ते अपूर्वा आणि त्याच्यामध्ये झालेलं भांडणं असो वा अक्षय आणि त्याच्यामध्ये झालेला वाद असो वा तेजस्विनी आणि त्याच्यामध्ये कामावरून झालेली बाचाबाची असो. घरातील काही सदस्यांनी प्रसादला सांगितले देखील जर सगळं घरं तुला काही सांगतं असेल तर नक्कीच तुझं काहीतरी चुकत असावं... आता नेमकं घरातील काही सदस्य त्याला टार्गेट करत आहे कि त्याचं काही खरंच चुकतं आहे हे कळेलच हळूहळू. 

आजदेखील असंच काहीसं घडणार आहे. आजही अक्षय आणि प्रसादमध्ये शाब्दिक चकमक होणार आहे. आता एकवेळा पोळ्या होऊ शकतात कारण रात्री टास्क आहे ना म्हणून. त्यावर प्रसादचे म्हणणे होते "हा जो वेळ आहे ना तुझ्याकडे असेल माझ्याकडे नाहीये... आणि या मुद्द्यावरून दोघांमधला वाद वाढत गेला.

अक्षय म्हणाला, सांगकाम्या शब्दाचा अर्थ ऐक त्यावर प्रसाद म्हणाला नाही ऐकत जा... अक्षय पुढे म्हणाला, शिस्तीत सांगतो आहे, शिस्तीत बोलायला कधी शिकणार आहेस. प्रसादचे म्हणणे पडले “तू ज्यादिवशी शिस्तीत सांगशील त्यादिवशी”. आता अजून हा वाद किती वाढला, पुढे काय घडलं बघूया आजच्या भागामध्ये.

टॅग्स :बिग बॉस मराठीअपूर्वा नेमळेकर