Join us

Bigg Boss Marathi 4 Chavdi : धो डाला...! महेश मांजरेकरांनी पहिल्याच आठवड्यात घेतली अपूर्वा नेमळेकरची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 12:07 IST

Bigg Boss Marathi 4 first Chavdi :मांजरेकरांचा पहिल्याच आठवड्यातील रुद्र अवतार पाहून स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा जणू रंगच उडाला.

Bigg Boss Marathi 4 first Chavdi :  ‘बिग बॉस मराठी 4’ सुरू होऊन आठवडा झाला आणि बिग बॉसच्या घरात नवे राडे सुरू झालेत. आता स्पर्धक राडे करणार म्हटल्यावर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) ‘शाळा’ घेणारच. शनिवारी   बिग बॉसच्या घरात चौथ्या सीझनची पहिली चावडी रंगली आणि पहिल्याच आठवड्यात मांजरेकर तापल्याचं दिसलं. होय, अपूर्वा नेमळेकरआणि प्रवास जवादे मांजरेकरांच्या रडारवर आलेत. यादरम्यान अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिच्यावर मांजरेकर चांगलेच बरसले.

आठवडाभर हे घर वाजलं ते अपूर्वा नेमळेकरमुळे.  तू सगळ्यांना सांगते आवाज खाली आवाज खाली... आवाज खाली... मुळात सर्वात जास्त ओरडत तूच होतीस..., असं मांजरेकर संतापून म्हणाले. मांजरेकरांचं हे रूप पाहून अपूर्वाही शॉक झालेली दिसली. मांजरेकर संतापले असताना.  प्रसाद जवादे यानं मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला आणि झालं...! मांजरेकरांनी त्यांलाही एकाच वाक्यात गप्पगार केला.  ऐ जवादे तुझी बाजू घेत नाहीये मी. मध्ये मध्ये तोंड खुपसायचं नाही..., असं म्हणत मांजरेकरांनी त्याला गप्प केलं.  मांजरेकरांचा पहिल्याच आठवड्यातील रुद्र अवतार पाहून  स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा जणू रंगच उडाला.

प्रेक्षकांच्या कमेंट्सपहिल्या दिवसाची चावडी पाहून प्रेक्षकांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. अब आयेगा मजा... म्हणत अनेकांनी मांजरेकरांचं कौतुक केलं. मी अजून एकपण एपिसोड पाहिला नाही. पण मांजरेकरांचं होस्टिंग म्हणजे बॉस जबरदस्त... मजा आ गया..., अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. अपूर्वाला असंच हवं. ती विचित्र आहे, अशी कमेंट एका युजरने केली. अपूर्वा बिग बॉसची बिग बॉस झाल्यासारखी वागतेय... गुड जॉब महेश सर, असं एका युजरने लिहिलं. व्वा धो डाला..., आधी योग्य वाटली शेवंता पण नंतर इरिटेड वाटली. उगाच सारखी भांडताना आणि ओरडताना दिसतेय. महेश सर बरोबर केलं..., अशा शब्दांत एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्यात.अपूर्वा नेमळेकरने पहिल्याच दिवशी प्रसाद जावडेसोबत भांडण करून आपल्या भांडखोर स्वभावाचं दर्शन घडवलं होतं. अगदी तिच्या भांडणाला, तिच्या सततच्या किंचाळण्याला प्रेक्षकही कंटाळल्याचं चित्र आहे. आता पहिल्याच आठवड्यात महेश मांजरेकरांनी असं फटकारल्यानंतर अपूर्वामध्ये किती बदल होतो, ते बघूच.

टॅग्स :बिग बॉस मराठीअपूर्वा नेमळेकरमहेश मांजरेकर मराठी अभिनेता