Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्लीज धीर धरा, मला थोडा वेळ द्या... ! विशाल निकमची चाहत्यांना हात जोडून विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 12:54 IST

Bigg Boss Marathi 3 Winner Vishal Nikam : ‘बिग बॉस मराठी 3’ चा विजेता विशाल निकमची चाहत्यांना नम्र विनंती, पण का?

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन(Bigg Boss Marathi3) कधीच संपला. पण सौंदर्याची चर्चा अद्यापही सुरू आहे. होय, बिग बॉस मराठी 3 चा विजेता (Bigg Boss Marathi 3 Winner)  विशाल निकम (Vishal Nikam) याची सौंदर्या (Saundrya) कोण, कुठली हे जाणून घेण्यास त्याचे चाहते उत्सुक आहेत. अलीकडे सोशल मीडियावर विशालचं नाव एका अभिनेत्रीशी जोडून हीच ती सौंदर्या असल्याचं दावा केला गेला होता. विशाल आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर अक्षया हीच विशालची सौंदर्या आहे, अशी चर्चा रंगली होती.   विशाल आणि अक्षयानं ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं आहे. व्हायरल फोटो याच मालिकेतील आहे. आता यावर विशालने स्वत: खुलासा केला आहे.

एक नम्र विनंती, अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे. यात तो लिहितो,‘मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, योग्य वेळ आल्यावर आणि काही खासगी गोष्टी सुरळीत झाल्यावर स्वत:हून सौंदर्याचं नाव सांगेल. ती एक सामान्य मुलगी असून अभिनयसृष्टीशी तिचा काही एक संबंध नाही. त्यामुळे इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तिसोबत माझं नाव  कृपया जुळवू नका. कारण यामुळे विनाकारण त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. हे लक्षात घ्या. आणि प्लीज धीर धरा... मला थोडा वेळ द्या.’ 

‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात फॅमिली वीक साजरा झाला होता आणि यादरम्यान विशालच्या  सौंदर्याची चर्चा सुरु झाली होती.  आई आणि धाकटी बहीण बिग बॉसच्या घरात विशालला भेटायला आली, तेव्हा विशाल सौंदर्याच्या आठवणीत व्याकूळ झालेला दिसला होता.‘ तू तिला फोन कर, तिच्याशी बोल’, असं तो आईला म्हणाला होता आणि त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सौदर्यांचा फोन आला होता.., असं आईनं त्याला सांगितलं होतं. बहिणीनेही सौंदर्या हे नाव घेतलं होतं.

बिग बॉसच्या घरात विशाल अनेकदा सौंदयार्शी एकटाच बोलताना दिसला होता. साहजिकच ही सौंदर्या कोण? हा प्रश्न चाहत्यांना सतावू लागला आहे. ही सौंदर्या कोण, कुठली, कशी दिसते, विशालची खास मैत्रिण आहे की आणखी कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सौंदर्या हे नाव विशालनं दिलेलं नाव आहे. कदाचित तिचं खरं नाव वेगळं आहे. विशाल लवकरच तिच्या नावाचा खुलासा करेल, अशी आशा करूयात.

टॅग्स :विशाल निकमबिग बॉस मराठी