Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3 Update: नीथा शेट्टीने केली घरातून बाहेर पडण्याची मागणी,वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 17:10 IST

बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्याच स्पर्धकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. मात्र सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती वाईल्ड कार्ड एंट्री झालेली नीथा शेट्टी साळवीची.

छोट्या पडद्यावर सध्या मराठी बिग बॉसची धूम पाहायला मिळतेय. बिग बॉसच्या घरातील ड्रामेबाजी, वाद आणि काही भावुक क्षण यामुळे मराठी बिग बॉसचा तीसरा सीझन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉसच्या घरात नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. मग ते सेलिब्रिटी स्पर्धक असलेल्या सदस्यांमधील वाद असो किंवा कडाक्याचे भांडण. बिग बॉसचं घर हे फुल ऑफ सरप्राईज आहे असंही म्हटलं जातं कारण इथं कधी कोण काय बोलेल किंवा कधी क्षणात नाती बदलतील याचा नेम नाही. बिग बॉसच्या घरात सगळ्याच स्पर्धकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. मात्र सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती वाईल्ड कार्ड एंट्री झालेली नीथा शेट्टी साळवीची.

बिग बॉस शोचं स्वरूप, घरातले वाद, भांडणं काही नवीन नाही. रसिकांना हे नाव चांगलंच माहिती आहे. बिग बॉसच्या घरातील आगामी आठवडा वेगळा ठरणार आहे. कारण घरात सध्या घडामोडी पाहून हा शो आता आणखी रंजक वळणार येणार असंच दिसतंय. सध्या या शोमुळे सहभागी झालेल्या स्पर्धकांची प्रचंड चर्चा होत आहे. या सगळ्यात आता नीथा शेट्टी साळवी प्रचंड चर्चेत आली आहे.काहीच आठवडे तिने घरात घालवले आहेत. नीथाने घरातून निर्मांत्यांकडे शो सोडण्याची मागणी केली आहे.यामागे कोणता वाद कारणीभूत आहे असा तुम्ही विचार करत असालच.

शोमध्ये नवनवीन टास्क होत असतात. त्यातच काही वादही होतात. अशाच एका टास्क दरम्यान नीथाची बाचाबाची झाली.  ‘जपून दांडा धर’ हे साप्ताहिक कार्यात मीराचे नीथासह चांगलेच खटके उडाले.  नीथाने मीराला धक्का दिल्याचे असे मीराचे म्हणणे आहे. नीथा अनफेअर खेळत असल्याचे तिने म्हटले आहे. यावर नीथाचा संताप अनावर झाला आणि तिने यामुळेच हा निर्णय घेतल्याचे समजतंय. या टास्कदरम्यान मीरा आणि नीथा दोन्ही भडकलेल्या आहेत.आता यापुढे हा वाद कितपत टोकाला जातो हे आगामी भागात कळेल. 

टॅग्स :बिग बॉस मराठी