Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3 Update:गायत्री, मीरा आणि दादूस यांच्या धम्माल गप्पा, कोण आहे बिग बॉसपेक्षा चालाख ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 16:53 IST

Bigg Boss Marathi 3: घरामध्ये आज रंगणार आहे “डब्बा गुल हे साप्ताहिक कार्य. या कार्यासाठी दोन्ही टीममधील सदस्य रणनिती आखताना दिसणार आहेत.

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  स्पर्धकांचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. स्पर्धक ग्रुप्स बनवत विरुद्ध स्पर्धकासाठी खेळी रचताना दिसतात. दिवसेंदिवस हे ग्रुप्सही वाढत जात आहे. सुरुवातीपासून घरात अनेक ग्रुप्स पाहायला मिळाले. मात्र त्यांच्यात दुरावाही आल्याचे पाहायला मिळाले. अनेकदा वेगेवेगळ्या गोष्टी घरात पाहायला मिळतात. हे पाहून आश्चर्यही व्यक्त करताना रसिक दिसतात. घरात कोणाची कोणासोबत चांगली मैत्री होईल हे तर सांगणेच कठीण. आता पुन्हा एकदा घरात चांगल्या मैत्रीचे वारे वाहु लागले आहेत. हे आहेत  दादूस, गायत्री आणि मीरा. 

आज बर्‍याच दिवसानंतर दादूस, गायत्री आणि मीरा धम्माल गप्पा मारताना दिसणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असं पण कोणीतरी आहे जे बिग बॉसपेक्षा चालख आहे... कोण आहे बरं तो सदस्य.आज मीरा, गायत्री गप्पा मारत असताना दादूसला दोघी सांगणार आहेत चाॅईसेस हा खेळ खेळतो आहे, तुम्ही खेळणार का? आणि हे विचारून दादूसला दोघींनी एका मोठ्या संकटात टाकले. दिलेल्या २ पर्यायांपैकी एकच नावं दादूस यांना निवडायचे आहे. 

गायत्रीने विचारले गुलाबजाम की रसमलाई ते म्हणाले गुलाबजाम त्यानंतर मीराने विचारायला सुरुवात केली गायत्री की सोनाली आणि एका सेंकदात ते म्हणाले सोनाली, मीरा की स्नेहा दादूस म्हणाले स्नेहा, उत्कर्ष की जय दादूसचे उत्तर होते उत्कर्ष, उत्कर्ष की तृप्तीताई त्यावर दादूस म्हणाले तुम तो बिग बॉससे भी चालाख निकले. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे “डब्बा गुल हे साप्ताहिक कार्य. या कार्यासाठी दोन्ही टीममधील सदस्य रणनिती आखताना दिसणार आहेत. टास्क सुरू होण्याआधी टीममधील सदस्य विरुध्द टीमला टास्कमध्ये कसे हरवता येईल याचे प्लॅनिंग करणार आहेत. यामध्ये मीरा तिच्या टीममधील सदस्यांसोबत तर दुसरीकडे जय आणि उत्कर्ष त्याच्या टीममधील सदस्यांसोबत चर्चा करतील आणि स्ट्रॅटजी आखताना पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठी