Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3: दोन वेळा मोडला स्नेहा वाघचा संसार; एकानं केलं शारीरिक शोषण तर दुसऱ्यानं केलं टॉर्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:15 IST

स्नेहा वाघ बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे आणि या शोमध्ये तिचा पहिला नवरा अविष्कारदेखील सहभागी झाला आहे.

लग्न म्हणजे स्वर्गात बांधलेल्या गाठी, सात जन्माचे सोबती पण, प्रत्येक लग्न टिकतातच असे नाही. बऱ्याचदा असे दोन लोक एकत्र येतात ज्यांचे कालांतराने एकत्र राहणेदेखील कठीण होऊन जाते. अशात ते दोघे विभक्त होण्यातच धन्यता मानतात. ज्योती आणि वीरा यासारख्या लोकप्रिय मालिकेत काम केलेली अभिनेत्री स्नेहा वाघची कहाणीदेखील अशीच काहीशी आहे. स्नेहा वाघने दोनदा लग्न केले परंतु तिची दोन्ही लग्न अपयशी ठरली. पहिल्या नवऱ्याने शारिरीक शोषण केले तर दुसऱ्याने टॉर्चर केले. स्नेहा वाघ बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे.

२०१८ साली स्नेहा वाघने एबीपी न्यूजला तिच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितले होते आणि आता तिने तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दलही खुलासा केला आहे. स्नेहाने वयाच्या १९व्या वर्षी अभिनेता अविष्कार दार्वेकरसोबत लग्न केले होते. या लग्नानंतर ती घरगुती हिंसाचाराला बळी पडली होती.

याबद्दल ती म्हणाली की, मी हे म्हणणार नाही की तो चुकीचा मुलगा होता पण तो माझ्यासाठी योग्य नव्हता. दोन अयशस्वी लग्नानंतर मला वाटते की पुरूषांना जिद्दी महिला आवडत नाहीत. आपल्या समाजाचा समज आहे की फक्त पुरूषच कुटुंबाची देखभाल करू शकतो पण हे खरे नाही. मला माहित आहे की मी माझे कुटुंबाची देखरेख ठेवण्यासाठी सक्षम आहे.

स्नेहा वाघने दुसरे लग्न इंटेरिअर डिझायनर अनुराग सोलंकी सोबत केले होते. हे लग्न फक्त ८ महिने टिकले. ते दोघे बऱ्याच कालावधीपासून वेगळे राहत आहेत, मात्र ते दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले नाही. मात्र लवकरच ते घटस्फोट घेतील.

स्नेहा म्हणाली की, पहिले लग्न केले तेव्हा मी वयाने लहान होते. ७ वर्षांनंतर मी पुन्हा लग्न केले. पण हे माझे दुर्भाग्य होते की मी पुन्हा चुकीच्या व्यक्तीची निवड केली. आता दोन्ही लग्न मोडल्यानंतर ती म्हणते की, तिच्या जीवनात आता प्रेम नाही, कोणतेच लग्न नाही. आता मी कोणत्याच गोष्टीसाठी तयार नाही.

स्नेहा वाघ बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे आणि या शोमध्ये तिचा पहिला नवरा अविष्कारदेखील सहभागी झाला आहे. त्यामुळे आता शोमध्ये ते दोघे एकमेकांशी कसे वागतात, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :स्रेहा वाघबिग बॉस मराठी