Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहानुभूती मिळवण्यासाठी भूतकाळ उगाळू नकोस..., अखेर महेश मांजरेकरांनी स्रेहा वाघला सुनावलंच..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 12:42 IST

Bigg Boss Marathi 3:  या वीकेंडला मांजरेकरांनी फार काही शाळा घेतली नाही. पण हो, स्रेहाला मात्र जाता जाता सुनावलंच...

ठळक मुद्देस्नेहाने वयाच्या 19व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला.

बिग बॉस मराठी 3’ची (Bigg Boss Marathi 3) चावडी म्हटलं की, शाळा भरणारचं. होय, शनिवारी आणि रविवारी महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) येतात आणि बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या चुका अगदी नेमकेपणानं त्यांच्या लक्षात आणून देतात. प्रसंगी अशा काही कठोर शब्दांत बोलतात की, समोरच्याची बोलती बंद होते.  या वीकेंडला मांजरेकरांनी फार काही शाळा घेतली नाही. पण हो, स्रेहा वाघ (Sneha Wagh) हिला मात्र जाता जाता सुनावलंच. सहानुभूती मिळवण्यासाठी खासगी आयुष्याच्या गोष्टी उगाळू नकोस, असा परखड सल्ला त्यांनी तिला दिला.एका एपिसोडमध्ये स्रेहा वाघ तिच्या पहिल्या पतीविषयी म्हणजेच अविष्कार दारव्हेकर याच्याविषयी बोलताना दिसली होती. स्नेहाचा पूर्वाश्रमीचा पती अविष्कार हाही बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक आहे. सुरेखा कुडचीसोबत गप्पा मारताना स्रेहाने अविष्कारबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. 

‘त्या आठवणी खूप वेदनादायी आहेत. त्या इतक्या वाईट आहेत की त्या आठवल्या तरी मला त्रास होतो. तो मला खूप मारायचा. रोज माझ्या चेह-यावर, शरीरावर मारल्याचे वण्र असायचे. मी अर्धमेल्या अवस्थेत सेटवर जायचे. काम संपलं की घरी जायची पण भीती वाटायची...,’ अशा अनेक गोष्टी स्रेहाने सुरेखाला सांगितल्या होत्या. या गोष्टी ऐकून सुरेखालाही धक्का बसला होता.नेमक्या याचवरून महेश मांजरेकरांनी स्रेहाला सुनावलं. ‘भूतकाळाविषयी, खासगी आयुष्यातील  समस्या नॅशनल टीव्हीवर सांगण्याची गरज नाही.  वैवाहिक आयुष्यात काय झालं हे देखील इतर स्पर्धकांना सांगण्याची गरज नाही,’ असे महेश मांजरेकर यावेळी म्हणाले. केवळ स्रेहाचं नाही तर अविष्कारलाही त्यांनी सुनावलं.  एक दिवस तुला माझा अभिमान वाटेल असं वचन तू स्रेहाला का दिलंस? असा प्रश्न त्यांनी अविष्कारला केला.  त्यानंतर महेश मांजरेकर यांनी अविष्कार आणि स्नेहाला दोघांनाही खडसावलं.

स्नेहाने वयाच्या 19व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला. त्यानंतर 2015मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहानाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :स्रेहा वाघबिग बॉस मराठीमहेश मांजरेकर