Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3: '...पण मी नाही तुटणार', असं का म्हणाली मीनल शाह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 14:46 IST

Bigg Boss Marathi 3: विकास, मीनल, विशाल आणि सोनाली विविध विषयांवर चर्चा करताना दिसणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल दुसर्‍या वाईल्ड कार्ड सदस्याची म्हणजेच नीथा शेट्टी – साळवी हिची एन्ट्री झाली. ती घरामध्ये जाण्यापूर्वीच चर्चा रंगली होती की, कोणत्या ग्रुपला ती जॉइन होणार. काल महेश मांजरेकर यांनी विचारले असता तिने विकास आणि मीनल यांची चांगले स्पर्धक म्हणून नावे घेतली. आता घरात गेल्यानंतर तिच्याविषयी चर्चा चांगलीच रंगलेली दिसून येते आहे. आज विकास, मीनल, विशाल आणि सोनाली विविध विषयांवर चर्चा करताना दिसणार आहेत.

विकासचे म्हणणे आहे, थोडीशी इनसिक्युरिटी झाली आहे आणि त्यांना कळालं आहे की नीथा स्वत:हून यांच्याकडे गेली, आदिशपण यांच्याकडे गेला. मग होतंय काय बाहेर ? कळलं का... सोनाली म्हणाली, गायत्री काय म्हणते माहिती आहे का... ही स्नेहा कॅप्टन्सीमध्ये स्वत:बद्दल तीन वाक्य बोलणार आहे. किती त्यांची बाजू घेते हे बघायचे आहे मला.

जे आहे ते खरे बोलणार - मीनल

मीनल म्हणाली आता हेच करायचे आहे, म्हणजे मी तरी तेच करणार आहे जे आहे ते खरे बोलणार आहे. मी तर सांगितले उत्कर्षने ट्रायच नाही केले. तुझ्या कॅप्टन्सीसाठी आमच्या हातात होते तुला मिळाले असते, आपण तेच बोलायच जे आहे त्यांच्या मनात… पण हेच आहे की ते तोंडावर बोलू नाही शकत आणि विशाल माझा इतका हात आणि पाय दुखतो आहे ना. मला असे वाटते आहे की असे नाही तोडत आहेत ना तर असे तोडायचा प्रयत्न करत आहेत पण मी नाही तुटणार.”

टॅग्स :बिग बॉस मराठी