Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 2 : पराग कान्हेरे पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात; कोण कोण करणार वेलकम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 13:17 IST

परागने प्रतिस्पर्धी नेहाच्या कानशीलात लगावली आणि त्यालाही बिग बॉसने बाहेर काढले. अर्थात पराग पुन्हा परतला. कारण बिग बॉसने त्याला केवळ निलंबित केले होते, घरातून बडतर्फ नाही. 

ठळक मुद्दे बिग बॉसने स्पर्धकांना ‘टिकेल तो टिकेल’ हा टास्क दिला होता. या टास्क दरम्यान परागने नेहाच्या कानाखाली मारली होती.

गेल्या काही दिवसांपासून कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी2’ सीझन २ प्रचंडचर्चेत आहे. सर्वप्रथम शिवानी सुर्वे हिने तब्येतीमुळे हा शो सोडला तर अभिजीत बिचुकलेला  चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉसच्या घरातून अटक केली गेली. यानंतर परागने प्रतिस्पर्धी नेहाच्या कानशीलात लगावली आणि त्यालाही बिग बॉसने बाहेर काढले. अर्थात पराग पुन्हा परतला. कारण बिग बॉसने त्याला केवळ निलंबित केले होते, घरातून बडतर्फ नाही. 

 कालच्या वीकेंडच्या डावात  महेश मांजरेकरांनी त्याला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. महेश मांजरेकरांनी पराग ज्याप्रकारे नेहाशी वागला त्याचा जाब विचारला आणि त्याला कठोर शब्दांमध्ये खडसावले. सदस्यांनी टास्क दरम्यान झालेल्या सगळ्याच गोष्टी पुन्हा एकदा सांगितल्या. परागनेही त्याची बाजू मांडली आणि पराग पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला.

आता इतक्या मोठ्या वादानंतर परागला घरात कोण कोण वेलकम करणार, घरातील प्रतिस्पर्धी परागच्या येण्यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

 बिग बॉसने स्पर्धकांना ‘टिकेल तो टिकेल’ हा टास्क दिला होता. या टास्क दरम्यान परागने नेहाच्या कानाखाली मारली होती. शिवाय माधव देवचक्के, वैशाली माडे व अभिजीत केळकर यांच्यासोबतही त्याची मारामारी झाली होती. त्यामुळे लगेच हा टास्क थांबवण्यात आला होते. त्यानंतर परागला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. पण आता पराग पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. तेव्हा त्याचा पुढचा प्रवास, त्याच्या स्ट्रॅटेजी कशा रंगतात, ते बघूच.   

  

टॅग्स :पराग कान्हेरेबिग बॉस मराठी