Join us  

'Bigg Boss 14'फेम विकास गुप्ताचा इंटिमेट व्हिडिओ लीक; 'या' अभिनेत्रीसोबत दिसला रोमान्स करताना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 11:15 AM

Vikas gupta: 'बिग बॉस'फेम विकास गुप्ता कायमच त्याच्या वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत असतो. त्यामुळे छोट्या पडद्यावरील 'कॉन्ट्रोवर्सी किंग' या नावानेदेखील तो ओळखला जातो.

छोट्या पडद्यावर कायम गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस (Bigg Boss). या शोचं प्रत्येक पर्व आणि त्यातील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. यामध्येच बिग बॉस १४चं (Bigg Boss 14) पर्व विसरणं अनेकांना शक्य नाही. हे पर्व घरातील टास्कसोबतच स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आलं. विशेष म्हणजे अजूनही यातील काही माजी स्पर्धक त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. त्यातलच एक नाव म्हणजे विकास गुप्ता (vikas gupta). कायम चर्चेत असलेला विकास यावेळी त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. त्याचा बेडरुममधील एक व्हिडीओ लीक झाला आहे. 

'बिग बॉस'फेम विकास गुप्ता कायमच त्याच्या वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत असतो. त्यामुळे छोट्या पडद्यावरील कॉन्ट्रोवर्सी किंग या नावानेदेखील तो ओळखला जातो. अलिकडेच विकासने त्याच्या इन्स्टाग्रामवर एका अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये  तो तिच्यासोबत इंटिमेट होताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

विकासने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबतच अभिनेत्री चेतना पांडे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते एका रोमॅण्टिक गाण्यावर  इंटिमेट होताना दिसत आहेत. चेतना आणि विकास हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र, त्यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फारसा आवडलेला नाही. 

'अशा व्यक्तीसाठी पुढे जा, ज्यावर तुम्ही प्रेम करता...', असं कॅप्शन विकासने या व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विकास गुप्ता आणि चेतना पांडे यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. मात्र, आपण केवळ चांगले मित्र असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारटेलिव्हिजन