Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझे केस खेचून मारहाण केली'; 'बिग बॉस'फेम डान्सरचा मेहुण्यावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 18:58 IST

Gori nagori: घरातल्याच व्यक्तीने केला गोरीवर हल्ला

प्रसिद्ध राजस्थानी डान्सर आणि बिग बॉसफेम गोरी नागोरी हिच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ मे रोजी आपल्या बहिणीच्या लग्नासाठी अजमेरमधील किशनगढ येथे गेलेल्या गोरीवर हल्ला झाला असून तिला जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे.

गोरीच्या मोठ्या बहिणीचं लग्न असल्यामुळे ती तिच्या मॅनेजर आणि अन्य टीम मेंबरसह अजमेरला गेली होती. यावेळी तिचा मेहुणा जावेद हुसैन याच्यासोबत काही कारणास्तव वादविवाद झाले. परिणामी, जावेद यांनी गोरीवर हल्ला करत तिला मारहाण केली.

यात जावेद यांनी माझे केस खेचले आणि मला मारहाण केली. तसंच माझा बॉडीगार्ड, मॅनेजर यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. एका बाऊन्सरच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. ज्यामुळे गोरीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यास गेली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. विशेष म्हणजे गोरीच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी पोलिसांनी तिच्यासोबत सेल्फी घेतल तिचा घरी जाण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे गोरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच तिने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे मदत मागितली आहे. तर, दुसरीकडे पोलिस ठाण्यातील एसएचओ सुनील बेडा यांनी गोरीने पोलिसांवर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.  

कोण आहे गोरी नागोरी?

गोरी नागोरीचं खरं नाव तस्लिमा बानो असं आहे. तिला हरियाणाची शकीरा असंही म्हटलं जातं. गोरी बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाली होती.  

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजन