Join us

जेवलास का?... 'बिग बॉस' फेम आयशा खान बोलते जबरदस्त मराठी, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 14:43 IST

आयशा खानला मराठी भाषेची भुरळ पडली आहे.

'बिग बॉस' फेम आयशा खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आयशा खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तिचे फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतात. आयशाने तिच्या अदांनी चाहत्यांना वेड लावलं आहे.  मात्र हिंदी, इंग्लिश फाडफाड बोलणारी आयशा ही मराठी भाषादेखील उत्तम बोलते हे तुम्हाला ठाऊक आहे का? तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून सगळेच तिचं कौतुक करत आहेत.

आयशा खानला मराठी भाषेची भुरळ पडली आहे. मराठीत बोलतानाची एक रील तिनं शेअर केली. यात ती मराठीत जबरदस्त मराठी बोलताना दिसत आहे. 'जेवलास का?' असं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत आयशा म्हणतेय, 'कसं काय?…हम्मम….जेवलीस का?…का?…तुला किती वेळा सांगितलंय, जेवण करायचं ना टाइमवर…जा जेवून ये'. आयशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. चाहते तिच्या मराठीचं कौतुक करत आहे.

आयशा खान ही 'बिग बॉस १७' या रिॲलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दाखल झाली होती. तिने मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले होते. मुनव्वरने आपली फसवणूक केल्याचा आरोपही तिने शोमध्ये केलेला. आयशाच्या मते, एकाच वेळी दोन मुलींना त्याने डेट केले होते.  काही महिन्यांपूर्वीच आयशाचं 'खाली बोतल' नावाचं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात अभिषेक कुमार व आयशाची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळाली होती. 

 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीसोशल मीडियामराठी