Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस' फेम अभिनेत्री करिश्मा तन्नाने गुपचूप केला साखरपुडा, कोण आहे ती खास व्यक्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 15:32 IST

अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या आयुष्यात एका स्पेशल व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या अभिनयापासून दूर आहे. ती सध्या ब्रेक एन्जॉय करते आहे. इतकेच नाही तर ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार तिच्या आयुष्यात एका स्पेशल व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. करिश्मा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. करिश्मा तन्ना रियल स्टेट वरूण बंगेराला डेट करते आहे. याशिवाय तिने वरूणसोबत गुपचूप साखरपुडा केला असल्याचे देखील समजते आहे. वरूणने सोशल मीडियावर करिश्मासोबत एक फोटो शेअर केला आहे. 

तर करिश्माने केकचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर अभिनंदन असे लिहिले आहे. या एका फोटोमुळे तिने गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला आहे. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांची भेट एका कॉमन फ्रेंड सुवेद लोहियाच्या माध्यमातून झाली.तेव्हापासून दोघेही एकमेकांसोबत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत आहेत. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा त्यांच्या नात्याबद्दल सीरियस आहेत. दोघे लवकरच लग्न करण्याची शक्यता आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये करिश्मा तन्नाने तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी सर्व जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते.

करिश्मा तन्नाने उपेन पटेलला डेट केले होते. दोघेही 'बिग बॉस हाऊस'मध्ये भेटले होते. दोघांनी 'लव्ह स्कूल' हा रिएलिटी शोही होस्ट केला आहे. करिश्मा तन्ना आणि पर्ल वी पुरी एकमेकांना डेट करत होते. नंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघे चांगले मित्र आहेत.

टॅग्स :करिश्मा तन्ना