Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Day 3 : स्पर्धेत चुरस वाढली; सीझनच्या पहिल्या नॉमिनेशनची चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 22:30 IST

बिग बॉसने घरात पहिल्या नॉमिनेशनचा मुद्दा काढून वातावरण गरम केले. यात जोड्यांना एका स्पर्धकाला नॉमिनेट करायचे आहे तर स्पर्धकाला जोडीला नॉमिनेट करायचे आहे.

बिग बॉसचे यंदाचे १२ वे सीझन ख-या अर्थाने सुरू झाले असं आता म्हणता येईल. रात्री स्पर्धकांमध्ये झालेल्या खडाजंगीनंतर बिग बॉसने आजच्या दिवसाची सुरूवात करत ‘रायता फैल गया’ या गाण्याने स्पर्धकांना उठवले. त्यांच्यासाठी आता कोणता टास्क असणार आहे, यासाठी हे गाणे वाजवण्यात आले.

आता स्पर्धेला सुरूवात झालीये असेच जणूकाही या गाण्यातून बिग बॉसला सांगायचे होते. स्पर्धकांनी हे गाणे ऐकल्यावर बिछान्यावरच हसत हसत लोळायला सुरूवात केली. त्याशिवाय दिपक ठाकूरने बिगबॉसच्या घरातील या भांडणांची ‘बॅटल ऑफ पाणिपत’सोबत तुलना करायला सुरूवात केली. 

घरात काही स्पर्धक एकमेकांशी भांडत होते तर काही जोड्यांमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसत होते. सृष्टी आणि उर्वशी यांच्यात बहिणींसारखे संबंध निर्माण झाले, दुसरीकडे सोमी आणि कृती यांच्यात मैत्री तर शिवानिश आणि रोमी यांच्यातही काहीसे चांगले बंध निर्माण झालेत. त्याशिवाय दुसरीकडे स्पर्धक हे खान बहिणींच्या विरोधात बोलू लागले तर करणवीर केवळ त्यांच्या बाजूने उभा होता. 

गंमतीजमती आणि मजा करणारा स्पर्धक दीपक ठाकूर हा त्याच्या छोट्या मोठया जोक्सने घरातील वातावरण स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याने एक इंग्रजी गाणे तयार केले, त्याचे शब्द आणि त्याचा अर्थ काय लागतोय? याच्याशी त्याला काहीही संबंध नव्हता. मात्र त्याच्या अशा वागण्याने सर्वांना चर्चेचा मुद्दा मिळाला. याच गोष्टीवर बराच वेळ चर्चा रंगली. 

बिग बॉसने घरात पहिल्या नॉमिनेशनचा मुद्दा काढून वातावरण गरम केले. यात जोड्यांना एका स्पर्धकाला नॉमिनेट करायचे आहे तर स्पर्धकाला जोडीला नॉमिनेट करायचे आहे. टास्कनुसार, दोन टीम एकत्र येऊन अंतिम निर्णय घेतील तसेच जोडी निवडतील. यावरून आता स्पर्धेची चुरस वाढलीय हे कळतेय. या आठवडयात कोण नॉमिनेट होणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :बिग बॉस 12दीपिका कक्कर