Join us

50 लाख अन् महागडी कार! बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत मुनव्वर फारुकीला बक्षीस स्वरुपात नेमकं काय मिळालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 08:57 IST

Munawar faruqui: मुनव्वर फारुकी बिग बॉस 17 चा विजेता झाल्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्येच त्याला बक्षीस म्हणून काय मिळालं याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे

छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या बिग बॉस 17 चा नुकताच ग्रँड फिनाले सोहळा संपन्न झाला. यंदाच्या पर्वात मुनव्वर फारुकीला (Munawar faruqui)  हा बिग बॉसचा विजेता ठरला आहे. या पर्वामध्ये अंतिम निकालाच्या काही वेळापूर्वी १० मिनिटांसाठी वोटिंग लाइन्स ओपन ठेवण्यात आल्या होत्या. ज्यात पुन्हा एकदा मुनव्वरला बहुमत मिळालं आणि तो विजयी झाला. विशेष म्हणजे २८ जानेवारीलाच मुनव्वरचा वाढदिवस असल्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी हे त्याला मिळालेलं गिफ्ट आहे. परंतु, या ट्रॉफीसोबत त्याला बक्षीस स्वरुपात आणखी काय काय मिळालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत.

मुनव्वरने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्यासाठी आसमान ठेंगणं झालं आहे. मात्र, त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला त्याची टॉप 3 मध्ये अभिषेक, मन्नारासोबत फाईट होती. त्यांच्यावर मात केल्यानंतर तो टॉप 2 मध्ये पोहोचला. परंतु, टॉप 2 मध्ये त्याने अभिषेकसोबत चुरशीची लढत दिली. मात्र, प्रेक्षकांच्या प्रेमाने त्याला या पर्वाचा विजेता केला. त्यामुळे अभिषेक सेकंड विनर ठरला.

मुनव्वरला बक्षीस स्वरुपात काय मिळालं?

मुनव्वर फारुकी बिग बॉस 17 चा विजेता झाल्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्येच त्याला बक्षीस म्हणून काय मिळालं याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तर, मुनव्वरने बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासोबतच त्याचा ५० लाख रुपये आणि Hyundai Creta ही आलिशान कार भेट म्हणून देण्यात आली आहे. 

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनसेलिब्रिटीअंकिता लोखंडे