Join us

Bigg Boss 17 : "तुझी आईदेखील पतीला अशीच लाथ मारायची का?", सासूचं वाक्य ऐकताच भडकली अंकिता लोखंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 10:50 IST

'बिग बॉस'च्या घरात सासूवर भडकली अंकिता, म्हणाली, "माझ्या आईवडिलांना..."

'बिग बॉस'च्या घरात आल्यापासूनच अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये छोट्या छोट्या कारणांवरुन खटके उडत आहेत. अनेकदा अंकिता आणि विकीमध्ये बिग बॉसच्या घरात वाद होताना दिसतात. या शोच्या येणाऱ्या भागात 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत. विकीची आईही 'बिग बॉस'मध्ये येणार आहे. अंकिता आणि विकीची आई यांचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सासूवर अंकिता भडकताना दिसत आहे. 

विकीची आई रंजना जैन 'बिग बॉस'च्या घरात खास अंदाजात एन्ट्री घेतात. 'बिग बॉस'च्या घरात येताच त्या एक शायरी ऐकवतात. "तुमने ऐसी कला जीने की कहां से सीखीं, मैंने समंदर से सीखा है जीने का सलीका. चुप-चाप से बहना और अपनी मौज में रहना", विकीच्या आईची शायरी ऐकून सगळेच हसायला लागतात. त्यानंतर विकीची आई आणि अंकितामध्येही खटके उडतात. 

अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात वादामध्ये विकीला लाथ मारली होती. याची आठवण करून देत विकीची आई म्हणते "ज्या दिवशी तू विकीला लाथ मारली. तेव्हा मी तुझ्या आईला कॉल केला होता. तुम्हीदेखील तुमच्या पतीला अशीच लाथ मारायचा का? असं मी त्यांना विचारलं." विकीच्या आईचे हे वाक्य ऐकून अंकिताचा पारा चढतो. पुढे त्या म्हणतात की विचार कर किती दु:ख झालं असेल. त्यानंतर अंकिता सासूला सुनावते. ती म्हणते, "माझे वडील या जगात नाहीत. कृपा करून तुम्ही माझ्या आईवडिलांना काहीही बोलू नका." 

'बिग बॉस'च्या घरातील विकीची आई आणि अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, 'बिग बॉस'मुळे विकी आणि अंकिताच्या नात्यातही दुरावा आल्याचं चित्र आहे. त्यांच्यामध्ये अनेकदा वाद विकोपाला जाऊन घटस्फोटाच्या गोष्टीही बोलल्या गेल्या आहेत.  

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटिव्ही कलाकार