Join us  

Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकलेची बाजू घेणं सलमानला पडलं महाग, ट्विटरवर ट्रेंड झाला ‘शेम ऑन सलमान’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 11:26 AM

Bigg Boss 15 : गेल्या आठवड्यात अभिजीत बिचुकले नॅशनल टीव्हीवर देवोलिनाकडे किसची मागणी करताना दिसला. सलमान खान ( Salman Khan) यावर बोलला. पण जे काही बोलला, त्यावरून सलमान जबरदस्त ट्रोल झाला.

 Bigg Boss 15 Kiss Controversy  : ‘बिग बॉस’च्या घरात फुटेज मिळवण्यासाठी स्पर्धक काय करतील याचा नेम नाही. गेल्या आठवड्यात अभिजीत बिचुकले   (Abhijeet Bichukale) नॅशनल टीव्हीवर देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिच्याकडे किसची मागणी करताना दिसला. त्याच्या या कृत्यानंतर घरात आणि घराबाहेरही जोरदार ‘हंगामा’ झाला. गेल्या ‘वीकेंड का वार’मध्येही याचे पडसाद उमटले. शोचा होस्ट सलमान खान ( Salman Khan) यावर बोलला. पण जे काही बोलला, त्यावरून सलमान जबरदस्त ट्रोल झाला.

होय, आधी तर सलमान बिचुकलेवर ‘जोक’ मारताना दिसला आणि नंतर या संपूर्ण वादात देवोलिना भट्टाचार्जी हिलाच त्याने चुकीचं ठरवलं. गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने आधी घरातील स्पर्धकांनी सर्वप्रथम एक क्लिप दाखवली. यात बिचुकले वारंवार देवोलिनाकडे किस मागताना दिसतोय आणि देवोलिना प्रचंड अनकम्फर्टेबल दिसतेय. यानंतर सलमानने या वादासाठी बिचुकले आणि देवोलिना दोघांनाही दोषी ठरवलं. बिचुकले चुकीचं वागला. पण देवोलिनाही यात दोषी आहे. बिचुकलेनं पहिल्यांदा किस मागितला, तेव्हाच तिने याविरूद्ध आवाज उठवायला हवा होता. तिने असं केलं नसेल तर ही तिची चूक आहे,असं सलमान म्हणाला.

सलमानचे हे बोलणं ऐकून सोशल मीडिया युजर्सचा पारा चढला. मग काय, सोशल मीडियावर भाईजान चांगलाच ट्रोल झाला. ट्विटरवर ‘शेम ऑन सलमान’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला. 

सलमान खान पीडितेला दोषी ठरवतोय, हे चूक आहे. एक मुलगी एखाद्यासोबत मस्ती मस्करी करत असेल तर तिला चूक ठरवलं जातं. प्लीज ‘पिंक’ हा सिनेमा पाहा, अशी कमेंट एका युजरने दिली. अनेकांनी सलमानवर नाराजी व्यक्त केली.

काय आहे प्रकरणगेल्या आठवड्यात घरातील सदस्यांना बिग बॉसने म्युझियममधील वस्तू चोरण्याचा टास्क दिला होता. यादरम्यान बिचुकले ब-याच वस्तू चोरल्या होत्या. माझ्याकडे खूप वस्तू आहेत, असे तो देवोलिनाला सांगतो. तो इथेच थांबत नाही तर देवोलिनाच्या गालांना स्पर्श करत ‘तेरे लिए कुछ भी करूंगा लेकिन पप्पी चाहिए,’ असं म्हणतो. त्याचं ते वाक्य ऐकून देवोलिना त्याच्यावर चांगलीच बरसते.  माझ्या चांगलुपणाचा फायदा उचलू नकोस, सीमा लांघू नकोस, अशा शब्दांत ती अभिजीतला समज देते. यावर मी मस्करी करत होतो, असं म्हणत बिचुकले सारवासारव करतो. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानअभिजीत बिचुकलेदेवोलिना भट्टाचार्जी