Join us  

जॅस्मिन भसीनला मिळाली बलात्काराची धमकी; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:42 AM

Jasmin bhasin: 'बिग बॉस 14'मधून बाहेर पडल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली.

'बिग बॉस 14' च्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे जॅस्मिन भसीन (Jasmin Bhasin). उत्तम अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या जॅस्मिनला बिग बॉसमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या शोमुळे जॅस्मिन चर्चेत आली. मात्र, या शो मधून बाहेर पडल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी तिला ट्रोल केलं. इतकंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली. अलिकडेच तिने एका मुलाखतीत तिला नेटकऱ्यांनी कशाप्रकारे त्रास दिला याविषयी भाष्य केलं आहे.

"ट्रोलिंग तर राहूच द्या. पण, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लोकांनी माझ्याविषयी टॉक्सिक चर्चा करायला सुरुवात केली. अगदी जीवे मारण्यापासून ते बलात्कारापर्यंत अनेक धमक्या मला देण्यात आल्या. या धमक्या कशासाठी? तर मी फक्त एका शोमध्ये भाग घेतला आणि त्या शोमध्ये मला पाहणं त्यांना आवडलं नाही म्हणून", असं जॅस्मिन म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी ज्या गोष्टींचा सामना केला आहे त्या अत्यंत गंभीर होत्या. या गोष्टींमुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला. पण, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि योग्य वैद्यकीय उपचार यामुळे मी या समस्यांमधून बाहेर पडले. पण, आता मला कोण ट्रोल करतंय की, नाही हे सुद्धा मला कळत नाही. आज मी अशा ठिकाणी आहे जेथे फक्त मला लोकांकडून प्रेम मिळतंय. त्यामुळे आता ट्रोलिंग माझ्यासाठी फार लहान गोष्ट झालीये."

दरम्यान, 'बिग बॉस 14'मुळे चर्चेत आलेली जॅस्मिन सध्या अभिनेता अली गोनीसोबत असलेल्या रिलेशनमुळे चर्चेत येत आहे. ही जोडी बिग बॉसपासून एकमेकांना डेट करत आहेत.

टॅग्स :जास्मीन भसीनबिग बॉस १४सेलिब्रिटीटेलिव्हिजन