Join us

काय म्हणता? ‘बिग बॉस 13’चा यंदाचा मुक्काम लोणावळ्यात नाही तर मुंबईत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 14:16 IST

येते काही महिने सलमानला श्वास घ्यायलाही उसंत नाही. सलमानचे हे हेक्टीक शेड्यूल पाहून ‘बिग बॉस 13’च्या मेकर्सने एक मोठा निर्णय घेतल्याचे कळतेय.

ठळक मुद्दे मागच्या वर्षी झालेल्या चुका लक्षात घेऊन यावर्षी येणाºया बिग बॉस 13 मध्ये निर्मात्यांनी एक मोठा बदल केला आहे. यावर्षी या शोमध्ये कॉमनर्सना म्हणजे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही.

सलमान खान सध्या जाम बिझी आहे. तूर्तास भाईजान ‘भारत’चे प्रमोशन करतोय. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलमान लगेच ‘दबंग 3’चे शूटींग पूर्ण करणार आहे आणि त्यापाठोपाठ ‘इंशाअल्लाह’च्या शूटींगमध्ये स्वत:ला झोकून देणार आहे. इतके कमी की काय म्हणून, याचदरम्यान ‘बिग बॉस 13’ हा शो सुरु होतोय. एकंदर काय तर येते काही महिने सलमानला श्वास घ्यायलाही उसंत नाही. सलमानचे हे हेक्टीक शेड्यूल पाहून ‘बिग बॉस 13’च्या मेकर्सने एक मोठा निर्णय घेतल्याचे कळतेय.

होय, चर्चा खरी मानाल तर, यावेळी ‘बिग बॉस 13’चा सेट लोणावळ्यात नाही तर मुंबईच्या फिल्म सिटीत उभारण्यात येणार आहे. ‘बिग बॉस मराठी 2’चे शूटींग होईल, त्याच सेटवर ‘बिग बॉस 13’चे शूटींग होणार असल्याचीही बातमी आहे. मराठी बिग बॉस हा शो महेश मांजरेकर होस्ट करत आहेत. महेश मांजरेकर यांनीच सलमानला येथील सेटचे लूक पाहण्यास सुचवले होते. सलमानला ही कल्पना जाम आवडली. कारण यामुळे त्याचा प्रवासात जाणारा बराच वेळ वाचणार आहे. त्यामुळे मराठी बिग बॉस 2 संपल्यानंतर याच सेटमध्ये काही बदल करून येथेच ‘बिग बॉस 13’चे शूटींग होईल, अशी प्लॅनिंग सुरू झाल्याचे कळतेय. आता हा सेट कसा आणि या सेटवरचे ‘बिग बॉस 13’चे घर कसे सजते, या घरात काय काय धम्माल घडते, ते बघूच.

बिग बॉस 12 ने टीआरपीच्या बाबतीत बºयापैकी निर्मात्यांचा अपेक्षाभंग केला होता. सेलिब्रिटी  आणि कॉमनर्स  यांच्या थीमवर आधारित हा लोकप्रिय शो  मागच्या वर्षी दर्शकांचे मनोरंजन करू शकला नाही. मागच्या वर्षी झालेल्या चुका लक्षात घेऊन यावर्षी येणाºया बिग बॉस 13 मध्ये निर्मात्यांनी एक मोठा बदल केला आहे. यावर्षी या शोमध्ये कॉमनर्सना म्हणजे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यावर्षी बिग बॉस 13 मध्ये फक्त सेलिब्रिटी लोक पाहायला मिळणार आहेत. 

टॅग्स :सलमान खानबिग बॉस 12बिग बॉस मराठी