Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 12 Day 11: बिग बॉसच्या घरात एन्ट्री होते ह्या मास्टर माइंडची

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 22:30 IST

बिग बॉसच्या घरात मास्टर माइंडची एन्ट्री होणार आहे. हा व्यक्ती म्हणजे विकास गुप्ता. ज्याने बिग बॉसच्या 11व्या सीझनमध्ये खूप धमाल केली होती.

ठळक मुद्देविकास गुप्ता सर्व स्पर्धकांना एकेक करून भेटतोविकास देतो स्पर्धकांना सल्ले

बिग बॉस12 या हिंदी रिएलिटी शोला सुरूवात होऊन दोन आठवडे होत आले आहे. मात्र दोन आठवडे झाल्यानंतरदेखील या शोची जास्त चर्चा होताना दिसत नाही. सीझन 12 यशस्वी न होण्यामागे सीझन 11 हे कारण आहे. कारण बिग बॉसचा 11वा सीझन आतापर्यंतचा सर्वात चर्चेत राहिलेला सीझन होता. त्यामुळे आता निर्मात्यांनी या शोमध्ये नवीन ट्विस्ट आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेही या शोमध्ये कोणता स्पर्धक कोणत्या लेवलवर आहे हे समजत नव्हते. त्यामुळे आता हे सांगण्यासाठी बिग बॉसच्या घरात मास्टर माइंडची एन्ट्री होणार आहे. हा व्यक्ती म्हणजे विकास गुप्ता. ज्याने बिग बॉसच्या 11व्या सीझनमध्ये खूप धमाल केली होती.

विकास गुप्ता सर्व स्पर्धकांना एकेक करून भेटतो आणि त्यांना बाहेरचे लोक त्यांच्याबद्दल काय विचार करत आहे हे सांगतो. दीपिका कक्कड, श्रीसंत, करणवीर व सृष्टी यांसारख्या सर्व सेलिब्रेटींना त्यांच्या खेळण्याची पद्धत बदलायला सांगतो. तर उर्वशी चांगली खेळते असे म्हणत तिचे कौतूक करतो. ते ज्या पद्धतीने खेळत आहेत ते किती योग्य व अयोग्य आहे हे विकास त्यांना सांगतो. तर दीपिकाला सांगितले की तू प्रत्येक कामात प्रतिनिधीत्व करत आहेस, मात्र त्यात तुझे व्यक्तित्व दिसत नाही.विकास गुप्ता बिग बॉसच्या घरातून गेल्यानंतर बिग बॉस अनाउंसमेंट करतो की तीन स्पर्धकांना काल कोठरीची शिक्षा होणार आहे. आता विकासने दिलेल्या सल्ल्याचे पालन कोण कोण करतो आणि कोण तीन स्पर्धक काल कोठरीची शिक्षा भोगणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस 12अनुप जलोटाजसलीन मथारूनेहा पेंडसे