Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 12: प्रीमिअरपूर्वी चाहत्यांना मोठा धक्का? भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया नाही घेणार घरात एन्ट्री??

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 10:10 IST

बिग बॉस’चे १२ वे सीझन आजपासून सुरू होतेय. शोच्या निर्मात्यांनी सगळी तयारी पूर्ण केली आहे. ‘बिग बॉस12’च्या नव-नव्या प्रोमोजची धूम आहेत. अशात ‘बिग बॉस12’च्या घरात कोण कोण स्पर्धक येणार, याबाबत प्रेक्षकांच्या कमालीची उत्सुकता आहे. 

बिग बॉस’चे १२ वे सीझन आजपासून सुरू होतेय. शोच्या निर्मात्यांनी सगळी तयारी पूर्ण केली आहे. ‘बिग बॉस12’च्या नव-नव्या प्रोमोजची धूम आहेत. अशात ‘बिग बॉस12’च्या घरात कोण कोण स्पर्धक येणार, याबाबत प्रेक्षकांच्या कमालीची उत्सुकता आहे. कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या घरातील पहिली स्पर्धक जोडी असणार, असे सांगितले गेले होते. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता भलतीच ताणली गेली होती. भारतीचे चाहते खूश झाले होते. पण आता चाहत्यांच्या या आनंदावर पाणी फेरणारी बातमी आहे.  ताजी बातमी खरी मानाल तर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया ‘बिग बॉस12’मध्ये सहभागी होणार नाहीत. होय, इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, भारती व हर्षची जोडी ‘बिग बॉस12’मध्ये भाग घेणार नव्हतीच आणि नाही. मग ‘बिग बॉस12’च्या गोव्यातील लॉन्चिंग इव्हेंटमध्ये भारती व हर्ष का पोहोचलेत आणि त्यांना सर्वात पहिली जोडी असे का सांगितले गेले,असा प्रश्न कुणालाही पडेल. तर हा केवळ प्रमोशन स्ट्रटेजीचा भाग होता. केवळ प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी आयोजकांनी भारती व हर्षला गोव्यातील प्रमोशनल इव्हेंटला बोलवले होते. आधी शोचे निर्माते दोघांनाही प्रीमिअर एपिसोडमध्ये आणू इच्छित होते. पण नंतर काही बदल केले गेलेत़ निश्चितपणे ही सगळ्यांसाठी धक्कादायक बाब आहे.

भारती अलीकडे एका मुलाखतीत ‘बिग बॉस12’बद्दल बोलली होती. हनीमूननंतर लगेच ‘खतरों के खिलाडी’साठी मला अर्जेंटीनाला जावे लागले होते आणि याचदरम्यान मला ‘बिग बॉस12’साठी फोन आला होता. ‘खतरों के खिलाडी’ संपल्यानंतरचं मी ‘बिग बॉस12’ करणार, असे त्यांना मी स्पष्ट केले होते. आम्ही केवळ पैशांसाठी ‘बिग बॉस12’ करतो आहोत, असेही भारती यावेळी म्हणाली होती. आता काय खरे आणि काय खोटे, ते आज बघूच.

टॅग्स :बिग बॉस 12भारती सिंगसलमान खान