Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहीद कपूरसाठी विशाल ‘लकी’

By admin | Updated: August 18, 2014 04:59 IST

निर्माता विशाल भारद्वाज हा आपल्यासाठी ‘लकी’ असल्याचे अभिनेता शाहीद कपूरने सांगितले. शाहीदने यापूर्वी विशालसोबत ‘कमिने’ या चित्रपटात काम केले होते

निर्माता विशाल भारद्वाज हा आपल्यासाठी ‘लकी’ असल्याचे अभिनेता शाहीद कपूरने सांगितले. शाहीदने यापूर्वी विशालसोबत ‘कमिने’ या चित्रपटात काम केले होते. आता विशालच्या ‘हैदर’मध्येही तो दिसणार आहे. ‘हैदर’च्या प्रसिद्धीसाठी शाहीदने मुंबईतील एका महाविद्यालयास नुकतीच भेट दिली. एक कलावंत हा सर्व प्रकारच्या दिग्दर्शकांसोबत काम करीत असतो. ‘हैदर’ची पटकथा लिहिल्यानंतर विशालने मला आवर्जून बोलावून घेतले. ‘तू माझ्यासाठी फार लकी आहेस. ‘हैदर’मध्ये तुझी भूमिका फार चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. अशा प्रकारचा प्रतिसाद मला पहिल्यांदाच मिळाला होता, असे शाहीदचे म्हणणे आहे. ‘हैदर’च्या ट्रेलरमध्ये शाहीद हा वेगळ्याच लुकमध्ये दिसत आहे. शाहीदची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी असल्याचे मानले जाते. एक दिवसाच्या शूटिंगसाठी त्याला चमनगोटादेखील करावा लागला होता. शेक्सपिअरच्या गाजलेल्या ‘हॅम्लेट’ या नाटकावर हैदर आधारलेला आहे, हे विशेष.