Join us  

 ‘बिग बॉस मराठी’ फेम रेशम टिपणीस साकारणार ऐतिहासिक भूमिका, ‘या’ हिंदी मालिकेत झाली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 1:26 PM

Resham Tipnis : 'बिग बॉस'मध्ये गाजलेली जोडी रेशम- राजेश पुन्हा आमने सामने...; ‘बिग बॉस मराठी’ गाजवल्यानंतर रेशम आता एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे...

बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेशम टिपणीस  (Resham Tipnis) एक लोकप्रिय अभिनेत्री. ‘बिग बॉस मराठी’ गाजवल्यानंतर रेशम आता एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. होय, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ (Punyashlok Ahilyabai) या सोनी टीव्हीवरील मालिकेत रेशम दिसणार आहे. या मालिकेत तर द्वारकाबाई होळकर हे पात्र साकारते आहे.

या मालिकेत ‘बिग बॉस मराठी’ फेम राजेश श्रृंगारपुरे आधीपासून एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आता रेशमचीही मालिकेत एन्ट्री झालीये. यानिमित्ताने ‘बिग बॉस मराठी’मधील दोन कलाकार पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. रेशम व राजेश श्रृंगारपुरे  ‘बिग बॉस मराठी’च्या एकाच सीझनमध्ये होते.

 सोनी वाहिनीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या भव्य ऐतिहासिक मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत राणी अहिल्याबाई होळकर यांचं जीवनचरित्र उलगडून दाखविलं आहे.  सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याने अहिल्याबाईंनी समाजातील अनिष्ट रूढींना आव्हान दिलं. आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी असामान्य योगदान दिलं.  एतशा संझगिरी, राजेश शृंगारपुरे आणि गौरव अमलानी अभिनीत ही मालिका आता 8 वर्षांची झेप घेणार आहे.  

लीपनंतर द्वारकाबाईची भूमिका करण्याची जबाबदारी आता सुखदा खांडकेकरकडून प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस हिच्याकडे जाणार आहे. मल्हारराव होळकरांची दुसरी पत्नी असल्याने द्वारकाबाईला नेहमीच असुरक्षित वाटत असे. खंडेराव तिला आवडत असला तरी मल्हाररावांच्या पश्चात तो राजा व्हावा हे तिला पटत नव्हते. ती चुकीचे वागण्यासाठी त्याचे कान भरत असे, जेणे करून तिचा मुलगा गुणोजी याला राज्य मिळावे. पण अहिल्या त्यांच्या जीवनात आल्यानंतर तिची असुरक्षितता आणखीनच वाढली आणि तिच्या विरोधात ती लोकांच्या मनात विष भरवू लागली. खंडेराव आणि अहिल्येत बेबनाव व्हावा यासाठी तिने खंडेरावाला पार्वतीशी लग्न करण्यास भाग पाडले. हीच द्वारकाबाईची भमिका रेशम साकारणार आहे.

टॅग्स :रेशम टिपणीसबिग बॉस मराठीराजेश श्रृंगारपुरेटेलिव्हिजन