Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “संयमाची ऐशी तैशी” कार्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 14:33 IST

बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर काल अद्भुत नगरामध्ये करण्यात आले आणि त्याचा राजा म्हणून बिग बॉस यांनी “संतोष चौधरी” म्हणजेच दादूस यांची निवड केली आणि त्यांच्यासोबत दिले तीन सल्लागार स्नेहा वाघ, गायत्री दातार आणि विशाल निकम.

छोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉस मराठी सीझन ३  सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक होणारे वाद यामुळे बिग बॉस सुरुवातीच्या काही भागातच हिट ठरला आहे. आज २६ ऑक्टोबरला बिग बॉसच्या घरात काय काय घडणार हे आपण जाणून घेणार आहोत. घरातले स्पर्धक बिग बॉसने दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतही घेत आहेत. काहींची खेळी सर्वश्रेष्ठ ठरते तर काहींची काही खास कामगीरी नसते.

बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर काल अद्भुत नगरामध्ये करण्यात आले आणि त्याचा राजा म्हणून बिग बॉस यांनी “संतोष चौधरी” म्हणजेच दादूस यांची निवड केली आणि त्यांच्यासोबत दिले तीन सल्लागार स्नेहा वाघ, गायत्री दातार आणि विशाल निकम. ज्यामध्ये काल मीनल आणि विकास जेव्हा आपली बाजू मांडायला आले तेव्हा विशाल याने सल्लागार म्हणून त्याचे परखड मत मांडले जे कुठेतरी विकासला अजिबात आवडले नाही. कारण विकासच्या मते विशालचा बालिशपणा त्यामधून कुठेतरी दिसून आला. आणि त्याच्या विरोधात मुद्दे शोधले जात आहेत असे देखील त्याला वाटले. 

काल विकास या घडलेल्या प्रकारामुळे भावूक देखील झाला, त्याला अश्रु अनावर झाले विशालने असे वागणे आणि बोलेल असा विचारही केला नव्हता. विशाल याचविषयी विकासशी बोलणार आहे. “स्वर्ग की नरक” या नॉमिनेशन टास्कमध्ये स्वर्गात उत्कर्ष, तृप्तीताई, मीनल आणि मीरा तर बिग बॉस यांनी दिलेल्या दंडामुळे स्नेहा वाघ, विशाल निकम, गायत्री दातार थेट नॉमिनेट झाले तर नरकध्ये म्हणजेच या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी जय दुधाणे, आविष्कार दारव्हेकर, विकास पाटील, सोनाली पाटील हे देखील नॉमिनेट झाले. आज घरामध्ये पार पडणार आहे संयमाची ऐशी तैशी हे साप्ताहिक कार्य. आता या टास्कमध्ये कोण संयम बाळगणार ? आणि कोणाचा संयम तुटणार बघायला मिळेल आजच्या भागामध्ये. 

टॅग्स :बिग बॉस मराठीगायत्री दातार