Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी 2 : कोण होणार बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 14:32 IST

बिग बॉसच्या घरात कालचा दिवस खूप वादग्रस्त आणि भावूक ठरला. विणा आणि नेहाला डोक्यावर अपात्र लिहून आणि गळ्यात पाटी लटकवून घरामध्ये वावरण्यास बिग बॉसने सांगितले.

ठळक मुद्देबिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला कॅप्टन कोण होईल हे आज कळणार आहेआज बरेच सदस्य या नियमाचे उल्लंघन करताना दिसणार आहेत

बिग बॉसच्या घरात कालचा दिवस खूप वादग्रस्त आणि भावूक ठरला. विणा आणि नेहाला डोक्यावर अपात्र लिहून आणि गळ्यात पाटी लटकवून घरामध्ये वावरण्यास बिग बॉस यांनी सांगितले. तर काल पराग आणि वैशालीमधील वाद, रुपाली, नेहा आणि अभिजित बिचुकले मधील वाद खूप टोकापर्यंत गेला आणि त्यानंतर रुपाली भाऊक देखील झाली.

 

 एकीकडे विणा आणि शिवानीमध्ये बाचाबाची झाली तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात KVR ग्रुप तयार झाला. आजचा दिवस जरा हलकाफुलका जाणार आहे. सगळ्या सदस्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात नागिन डान्स या धम्माल गाण्याने होणार आहे. KVR ग्रुपचे बॉनडिंग आणि काय आहे त्यांची इच्छा हे बघायला मिळणार आहे. 

बिग बॉसच्या घरात जोपर्यंत लाईट्स बंद होत नाही तोपर्यंत सदस्यांना झोपण्यास सक्त मनाई असते. आज बरेच सदस्य या नियमाचे उल्लंघन करताना दिसणार आहेत. ज्यामुळे घरामध्ये कोंबडा बऱ्याचदा आरवताना ऐकायला मिळणार आहे. 

 सगळ्यात उत्सुकतेची गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला कॅप्टन कोण होईल हे आज कळणार आहे. याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. अभिजित बिचुकले यांच्या टीममधून नेहा आणि वैशाली माडेच्या टीम मधून शिव यांना कॅप्टनसीची उमेदवारी देण्यात आली आहे. घरातील सदस्य कोणाला देणार पहिला कॅप्टन बनण्याचा मान आज कळेल.

टॅग्स :बिग बॉस मराठी