Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ : घरात आज कोणती टीम मारणार बाजी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:45 IST

बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य “एक डाव धोबीपछाड.”

ठळक मुद्देआता या टास्कमध्ये कोण जिंकणार ? हे बघणे रंजक असणार आहे

बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य “एक डाव धोबीपछाड.” ज्यामध्ये टीम A आणि टीम B अशा टीम करण्यात आल्या आहेत. नेहा शितोळे टीम A आणि विद्याधर जोशी टीम B चे मॅनेजर असणार आहेत तर वैशाली माडे संचालक असणार आहे. आता या टास्कमध्ये कोण जिंकणार ? हे बघणे रंजक असणार आहे. या आठवड्यामध्ये सही रे सही या टास्कमध्ये विणा जगताप, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर, अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले तर शिवला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केल्याने तो देखील थेट नॉमिनेट आहे. तर हीनाचा घरातील पहिला आठवडा आणि वैशाली घराची कॅप्टन असल्याने त्या या आठवड्यात सेफ आहेत.... कोण घराबाहेर जाईल ? कोणाला प्रेक्षकांची मते मिळणार ? हे कळेलच.

एक डाव धोबीपछाड या टास्कमध्ये नेहा आणि विद्याधर मॅनेजर असल्याने स्वत:ची टीम कशी जिंकेल याचा चातुर्याने कसा मार्ग काढतील आणि उपाय काढतील ? काय डिल करतील ? आणि कसे दुसऱ्या टीमला या टास्कमध्ये हरवतील हे आजच्या टास्क मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तसेच टीम A म्हणजेच नेहाच्या टीमला वैशाली माडे म्हणजेच टास्कची संचालिका हिच्यावर संशय आहे आता नेहा आणि त्यांच्या टीमचे असे का म्हणणे आहे ? वैशालीने असे खरंच केले का ? आज कळेलच... काल शेरास सव्वा शेर या टास्कमध्ये रुपाली भोसले आणि अभिजीत बिचुकले मध्ये कडाक्याचे भांडण झाले... कोण पहिल्या नंबरवर रहाणार यावरून किशोरी आणि अभिजीत केळकर यांच्यामध्ये देखील वादावादी झाली. तर नेहा आणि सुरेखा ताईमध्ये देखील जेवणावरून बराच वाद झाला आणि नेहाने वैशालीला सांगितले तिला किचन टीममध्ये रहायचे नाही... तर परागने किशोरी, रुपाली यांचा ग्रुप सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितले. आता परत तुमच्या ग्रुपमध्ये येण अशक्य आहे असे देखील तो त्यांना म्हणाला.

रुपाली आणि किशोरीने त्याला बरंच समजविण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला... आज घरामध्ये काय घडेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठी