Join us  

'अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना मिळतं जास्त मानधन'; प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेसचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 12:17 PM

Gunjan pant: अलिकडेच एका प्रसिद्ध अभिनेत्री कलाविश्वातील एक कटू सत्य सांगितलं आहे. या इंडस्ट्रीमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी मानधन मिळतं असं तिने सांगितलं आहे.

सध्याच्या काळात सर्वाधिक चर्चिलं जाणारं जर कोणतं क्षेत्र असेल तर ते म्हणजे सिनेसृष्टी. या इंडस्ट्रीमधील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक, चाहते उत्सुक असतात. त्यातच येथील सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे सर्वाधिक चर्चेत येतात. यात त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलपासून ते त्यांच्या स्टारडमपर्यंत. कलाविश्वातील झगमगाट प्रत्येकालाच आकर्षित करत असतो. परंतु, ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात. तसंच कलाविश्वाचीही एक काळी बाजू आहे. अलिकडेच एका प्रसिद्ध अभिनेत्री कलाविश्वातील एक कटू सत्य सांगितलं आहे. या इंडस्ट्रीमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी मानधन मिळतं असं तिने सांगितलं आहे.

गुंजन पंत (Gunjan Pant) ही नाव अनेकांच्या परिचयाचं आहे. भोजपुरी कलाविश्वात गुंजनने तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, इतकी वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतरही स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लेखलं जातं असं मत तिने मांडलं आहे.  अलिकडेच एका मुलाखतीत तिने तिचं मत मांडलं आहे.

रवीकिशन ते खेसारीलाल यादव! भोजपुरी कलाकारांचं मानधन किती असतं माहितीये का?

अभिनेत्यांना मिळते जास्त फी

"प्रत्येक अभिनेत्री तिच्या भूमिकेला जिवंत करण्यासाठी, त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत करत असते. परंतु, अनेकदा चित्रपटांमध्ये पुरुषांनाच मुख्य भूमिका दिली जाते. इतकंच नाही तर मानधनाच्या बाबतीतही त्यांना स्त्री कलाकारांपेक्षा जास्त फी दिली जाते. ज्यावेळी असं काही घडतं त्यावेळी खरंच फार वाईट वाटतं. कोणताही चित्रपट हिट होण्यासाठी अभिनेत्रींची देखील भूमिका तितकीच महत्त्वाची असते", असं गुंजन म्हणाली. 

पुढे ती म्हणते, "चित्रपटगृहांमध्ये ज्यावेळी प्रेक्षकवर्ग येतो, त्यावेळी तो अभिनेता आणि अभिनेत्री या दोघांसाठी येत असतो. चित्रपटाच्या शुटिंगपासून ते प्रमोशनपर्यंत आम्हीदेखील तितकीच मेहनत करतो. त्यामुळे अभिनेत्रींनादेखील अभिनेत्यांइतकंच मानधन मिळायला हवं."

दरम्यान, गुंजन पंत ही भोजपुरी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. २०१४ मध्ये ‘करनी के फल आज ना ता कल’ या चित्रपटातून तिने भोजपुरी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती 'गुंडा', 'कहार', 'ये इश्क बड़ा बेदर्दी है' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाटिव्ही कलाकार